
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीत इनकमिंग.
- by Rameshwar Gawai
- Jan 02, 2021
- 572 views
बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाने नववर्षाचे स्वागत केले आहे.३० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून यापुढेही मोठ्या संख्येने कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी केला आहे.
शुक्रवारी सोनिवली येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात कात्रप, बॅरेज रोड, रमेशवाडी आदी परिसरातील ३० तरुणांनी कालिदास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये सुशीलकुमार धाइंजे, अविनाश वाघमारे, कुणाल साबळे, विकास गवारे, बंटी ढोबळे, संदीप गायकवाड, आदेश गवारे, नरेश जाधव आदींचा समावेश असल्याची माहिती कालिदास देशमुख यांनी दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख, महिला शहर अध्यक्ष अनिसा खान, राष्ट्रवादी सेवा दल जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, कामगार सेल शहराध्यक्ष सूर्यराव, शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, एन डी पाटील, सेवक देशमुख, अमित कदम, लक्ष्मण फुलवरे आदी उपस्थित होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम