नवी मुंबईत काँग्रेस प्रणित इंटक सघटना वाढी साठी सर्वाेतपरी प्रयत्न करणार मनोहर शिवपुजे यांचे प्रतिपादन

नवी मुंबई (सुनिल गायकवाड)नवी मुंबई परीसर कामगार क्षेत्रात अग्रेसर परीसर म्हणून ओळखले जातो कामगारांचे दुःख समजण्यासाठी अनेक संघटना उदयास आल्या तरी कामगारांचे हीत आज पर्यंत कोणत्या संघटना दुर करु शकतील याची शाश्वती कामगारांनाच दिसत नसल्याचे चित्र समोर आहे 

काँग्रेस प्रणित इंटक संघटना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचे प्रश्न मांडत असुन कामगारांना समान न्याय समान हक्क मिळण्यासाठी तत्परतेने काम करत आहे.

देशातील प्रत्येक राज्यात इंटक ही कामगारांच्या ताकदीने बनलेली  संघटना आहे व त्याच ताकदीने इंटक सुध्दा कामगारांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहत असुन भांडवलशाहीला सळो की पळो करुन सोडणारी इंटकची ताकद नवी मुंबई क्षेत्रात कुठे तरी कमी पडत असल्याची खंत व कबुली महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रणित इंटक चे सचिव पत्रकार तथा साहित्यिक मनोहर शिवपुजे यांनी व्यक्त केली आहे.

नवमुंबई हा परीसर एम आय डी सी म्हणून ओळखला जाते या परीसरात अनेक कंपन्या कार्यरत आहेत काही कंपन्या बंद अवस्थेत असुन मोठ्या प्रमाणात कामगार वर्गावर बेकारीचे संकट आहे.

या संकटातुन कामगार वर्गाला दुर करण्या साठी इंटक संघटना वचनबध्द व कटीबध्द आहे या साठी कामगारांनी सुध्दा या पुढे इंटक संघटनेची कास धरली पाहीजे असे मत सुध्दा शिवपुजे यांनी व्यक्त केले.

दरम्यान: इंटक वाढीसाठी मनोहर शिवपुजे यांनी ठिकठिकाणी कामगारांचे प्रश्न जाणुन घेण्यासाठी बैठकी  सुरु केल्या असुन कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात इंटक मध्ये समील करण्याचा सपाटा सुरु केला आहे.

शेकडो कार्यकर्ते इंटक सोबत असल्याची कबुल शिवपुजे यांनी दिली या पुढे नवी मुंबईत इंटक आणि काँग्रेस पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येईल नवी मुंबईत इंटक ला पालवी फुटत असुन येत्या काही दिवसात इंटक मोठ्या वटवृक्षाच्या छायेत दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

संबंधित पोस्ट