पत्रकार सुरक्षा समितीच्या बदलापुर शहर अध्यक्ष पदी भरत कारंडे यांची नियुक्ती .

बदलापूर(प्रतिनिधी):  पत्रकार सुरक्षा समितीच्या कुळगाव बदलापुर शहर अध्यक्ष पदी श्री भरत कारंडे यांची निवड करुन त्यांना पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले, पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे आणि ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी  २५ डिसेंबर रोजी भरत कारंडे यांच्या कार्यालयात सदरचे नियुक्ती पत्र देऊन श्री भरत कारंडे यांच्यावर बदलापुर शहराची धुरा सोपवली आहे ,भरत कारंडे हे  गेल्या वीस  वर्षा  पासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत असुन त्यांनी आपल्या रोखठोक लिखाणातून अनेक शासकीय अशासकीय, आणि समाजातील दृष्ट प्रवृत्तींचा पर्दाफाश केला आहे . तर  अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आहे,भरत कारंडे हे बदलापुर विकास समितीचे बदलापुर शहर उपाध्यक्ष असुन  कुळगाव बदलापुर नगरपालिकेतील मोठ मोठे घोटाळे बाहेर काढून भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना न्यायालयाच्या कक्षेत आणुन त्यांना संविधानिक मार्गाने शिक्षा मिळणे या साठी श्री भरत कारंडे यांचा संघर्ष सुरूच असुन त्यांना या सामाजिक लढाईत पत्रकार सुरक्षा समिती  एक वरदान ठरणार असुन समस्त पत्रकार सुरक्षा समिती भरत कारंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची माहिती  समितीची  ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे आणि ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप रोकडे यांनी दिली आहे . 

सामाजिक जीवनात काम करत असताना पत्रकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत पत्रकार बांधवांच मनोबल वाढवण्यासाठी ही समिती कार्यरत असुन प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या  पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ही समिती सदैव तत्पर आहे.  असे प्रतिपादन समितीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी केले ,कुळगाव बदलापुर शहराची जबाबदारी सोपवून जिल्हा समितीने जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहुन पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे मत समितीचे कुळगाव बदलापुर शहर अध्यक्ष भरत कारंडे यांनी व्यक्त करुन जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे आणि सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांचे आभार मानले,

संबंधित पोस्ट