
बदलापुरात हुक्का पार्लरवर धाड . १३ जणांवर कारवाई.
- by Rameshwar Gawai
- Dec 27, 2020
- 1216 views
बदलापूर(प्रतिनिधी) :बदलापूरात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करून पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच २५०० रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
शनिवारी उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने बदलापूर पूर्वेला कारमेल शाळेसमोर बदलापूर- अंबरनाथ रस्त्यावर सक्सेस पॉईंट हॉटेलमध्ये छापा टाकून ही कारवाई केली आहे. या कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामध्ये बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, कळवा ठाणे आदी परिसरातील २५ ते ३८ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी हुक्क्याचा एक सीलबंद व सीलबंद नसलेला खोकाही हस्तगत केला आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या युनिट-४ चे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंध तसेच मनाई असलेले सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियमाच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम