
अंबरनाथ मध्ये वंचित बहुजन आघाडीत फुट धनंजय सुर्वे राष्ट्रवादीत दाखल .
- by Rameshwar Gawai
- Dec 25, 2020
- 1055 views
अंबरनाथ(प्रतिनिधी): अंबरनाथ मध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये दुफळी माजली असुन वरिष्ट नेत्यांच्या दुर्लक्षा मुळे वंचित मध्ये फुट पडत चालली आहे . अंबरनाथ येथिल वंचित चे दमदार नेते धनंजय सुर्वे यानी वंचित च्या वाढलेल्या दुफळीला कंटाळुन अखेर वंचित ला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्याने वंचित मध्ये फुट पडली आहे .
अंबरनाथ मध्ये वंचित बहुजन आघाडी मध्ये असलेले धनंजय सुर्वे यानी अंबरनाथमध्ये चांगले काम केले होते . परंतु वंचित मधिल वरिष्ट नेत्यानी चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्या कडे दुर्लक्ष केले आहे . शहरात काम करत असताना पदाच्या नियुक्त करुन त्याना पदे देन्यात आली नव्हती . त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत . तेव्हा वंचित चे नेते धनंजय सुर्वे याना सुध्दा वंचित च्या नेत्यानी कोणते ही पद दिले नाही . तर कल्याण लोकसभा व अंबरनाथ विधानसभेच्या निवडणुकीत सुर्वे यानी पक्षाला चांगली मते मिळवुन दिले आहेत . तरी पण त्यांच्या कार्याची दखल वंचित ने घेतली नाही . त्यामुळे त्यानी वंचित बहुजन आघाडी सोडन्याचा निर्णय घेवुन राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे . दरम्यान मुंबई येथिल यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील . खा . सुप्रिया सुळे . जितेंद्र आव्हाड . नवाब मलिक . छगन भुजबळ . अंबरनाथ चे शहर अध्यक्ष सदाशिव पाटील ( मामा ) यांच्या उपस्थितीत धनंजय सुर्वे . सुधाकर बर्वे . संजय बंसाळ . सत्यजित गायकवाड . राजेश बनसोडे व यांच्या असंख्य कार्यकर्त्यानी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे . तर सुर्वे यांची सदाशिव पाटील यानी अंबरनाथ शहर सरचिटणीस पदावर नियुक्ती केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम