बोगसपणे नोंदित हौसिंग सोसायटयांच्या तक्रारीकडे उपनिबंधक-सहकारी संस्था,वसई,यांचे दुर्लक्ष
- by Adarsh Maharashtra
- Dec 24, 2020
- 1012 views
विरार(दीपक शिरवडकर) - हौसिंग सोसायटी नोंदणी करताना ट्रान्सफरर-ट्रान्सफरी-कन्फर्मिंग पार्टी असा त्रिसदस्यीय करारनामा, इमारतीची सी सी/ओ सी/सात-बारा उतारे/डीड ऑफ डिक्लेरेशन,बिनशेती परवाना मोफा कायद्याच्या नियमातील नमुना ७ अर्ज/रचनाकार यांचा बांधकामाबाबतचा दाखला जागेचे कुलमुखत्यारपत्र/सक्षम अधिकाऱ्याने मंजूर केलेल्या बांधकामाचा नकाशा/जागा निर्वेध असल्याबाबतचा टायटल सर्च रिपोर्ट/जागा विकसित करण्यास घेतली असल्यास विकसन करारनामा/प्लॉट बिगरशेती केलेला सक्षम अधिकाऱ्याचा दाखला/प्लॉट खरेदीचा करारनामा,मालमत्ता पत्रक आदी कागदपत्रे सादर करावी लागतात अशी कागदपत्रे सादर झालेली नसताना सादर झालेली कागदपत्रे खोटी असल्याचे माहीत होऊनही उपनिबंधक सहकारी संस्था वसई,कार्यालय व जिल्हा उपनिबंधक,पालघर कार्यालयाच्या संमतीने सोसायटयांची नोंदणी केली गेली आहे.
तसेच एकाच नोंदणी क्रमांकाने गाव नारंगी,विरार पूर्व येथे वेगवेगळ्या दोन हिस्सा क्रमांकाच्या जागांवर हौसिंग सोसायटयांची नोंदणी करणे,पालिका संकेतस्थळावरुन माहिती न घेणे,इमारतच अस्तित्वात नसताना,अवैध असताना हौसिंग सोसायटीस मान्यता देणे,जागेच्या गाव-नमुना ७/१२ उताऱ्याची,मालमत्ता पत्रकाची तपासणी न करताच हौसिंग सोसायटी नोंदविणे जमिनमालकांचे आक्षेप असताना,प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची दखल न घेता हौसिंग सोसायटीची नोंदणी करणे कार्यकारिणी निवडणे,जुजबी अहवाल सादर करणे,सोसायटयांचे खोटे लेखा अहवाल पँनलवरील ऑडिटरांकडून दप्तरी दाखल करणे असे प्रकार वसई तालुक्यात झाले आहेत. यामुळे मोठी आर्थिक हेराफेरी होत आहे.अशा हौसिंग सोसायटयांकडून रहिवाशांना धाक दाखवून पिळवणूक केली जाते या सर्व गोष्टीची माहिती मा.सहकार सचिव, महाराष्ट्र राज्य, मा.सहकार आयुक्त-निबंधक, सहकारी संस्था पुणे,मा.विभागीय सहनिबंधक, कोकण विभाग, मा.जिल्हा उपनिबंधक,पालघर तसेच मा.उपनिबंधक वसई कार्यालयास असूनही सहकारी गृहनिर्माण अधिनियम १९६० चे कलम ७९(अ),९७ वा घटना दुरूस्ती व सहकारी संस्था (सुधारणा)अधिनियम २०१३ अन्वये आदर्श उपविधी व राज्याचे राज्यपाल यांच्या नावाने व आदेशाने,मा.सहकार सचिव, मा.सहकार आयुक्त-निबंधक,महाराष्ट्र यांचे निर्णय-आदेश असताना,सहकारी गृहनिर्माण संस्था कामकाज संहितेस अधीन राहून कार्यवाही होताना दिसत नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचे अडचणीचे,गैरसोयीचे वाटणारे तक्रारअर्ज कार्यालयीन स्तरावरून मनमानीपणे निकाली काढले जातात.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम