राष्ट्रवादीच्या शिबिरात २८७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी.

बदलापूर(प्रतिनिधी) :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बदलापूरात आयोजित शिबिरात २८७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता आठवड्याभरात पुन्हा मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष दिनेश धुमाळ यांनी दिली आहे. 

दिनेश धुमाळ व वैशाली धुमाळ यांनी बदलापूर पूर्वेकडील मानकिवली परिसरात रविवारी  मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी १० वा.पासून संध्याकाळी ७ वा. पर्यंत सुरू राहिलेल्या या शिबिरात २८७  नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३० जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील उपचार घेण्याबाबत सल्ला देण्यात आला. ज्यांना चष्मा लागला आहे,परंतु खरेदी करणे शक्य नाही,अशा नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. डॉ. संदेश जाधव, डॉ. निलेश कुंभार व डॉ. तृष्णा जडिया यांनी नागरिकांची नेत्र तपासणी करून पुढील उपचाराबाबत सल्ला दिला. राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष अनिसा खान, उपाध्यक्ष ज्योती वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत यशवंतराव, शहर सचिव लक्ष्मण फुलवरे आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट