विरारमध्ये भंगारातील डब्यातून खाद्यतेल विक्री

विरार(प्रतिनिधी) - भंगारातील पत्र्यांच्या डब्यांवर नविन लेबल लावून डब्यात खाद्यतेल भरून ते अशुद्ध तेल दुकांनामध्ये विकून नागरिकांच्या आरोग्याशी विरारमधील काही व्यापारी खेळत असून याठिकाणी शासनाच्या अन्न व औषधे प्रशासनाने एखादी दुर्घटना घडण्याआधी वेळीच कार्यवाही करावी असे विरारकरांचे म्हणणे आहे.

विरारमध्ये "लो-प्राईझ" म्हणत काही बडे व काही छोटे व्यापारी-भंगारातील पत्र्यांच्या डब्यावरील जुन्या लेबलवर नविन लेबल चिटकवून अशुद्ध खाद्यतेल विकत आहेत. जुन्या भंगारातील डब्यावर गुलाब तेल नावचे लेबल असताना तसेच डब्यावर तसे एम्बाँसिंग स्पष्ट दिसत असताना त्यावर अन्नपूर्णा तेल असे नविन लेबल लावून खाद्यतेल विकले जाते.ग्राहकही या गोष्टीला बळी पडत आहेत.

संबंधित पोस्ट