राष्ट्रवादीच्या महिला नेत्यावर पोलिसाचा बलात्कार .
- by Rameshwar Gawai
- Dec 04, 2020
- 1914 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मिलिंद हिंदुराव या पोलीस कर्मचाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे काल माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर लागोपाठ या दुसऱ्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे
पीडित महिला ही राष्ट्रवादी काँग्रेसची महिला पदाधिकारी आहे, अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मिलिंद हिंदुराव याच्याशी महिलेशी ओळख झाली, त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले होते, यानंतर लग्नाचे आमिष दाखवून लॉकडाउनच्या काळात एका मंदिरात लग्न केले व जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले . मात्र पीडित महिलेने कायदेशीर लग्न करण्याची मागणी करताच हिंदुराव याने तिला जातीवरून हिणवत लग्नाला नकार दिला.
याबाबत आधी पोलीस ठाण्यात अर्ज देऊनही कारवाई न झाल्याने पीडिताने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत कारवाईची मागणी केली. त्यानंतर तातडीनं शिवाजीनगर पोलिसांनी मिलिंद हिंदुराव याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला, अजूनही हिंदुराव याला अटक करण्यात आलेली नाही. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीच्या पीडित पदाधिकाऱ्याने केली आहे. तर पोलिसांनी या प्रकरणी काहीही बोलण्यास नकार दिला आहे .

रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम