अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष व भाजपाचे पदाधिकारी सुनिल वाघमारे यानी एका गरजु महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन हा नराधम वाघमारे पोलिस ठाण्यातुन  फरार झाला आहे . 

अंबरनाथ पुर्व येथे राहणारे सुनिल वाघमारे यांच्या कडे एक महिला मदत मांगन्या करिता गेली होती . याने मदत तर केलीच नाही उलट तिच्यावर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला . कोणाला ही सांगितले अथवा पोलिस ठाण्यात तक्रार केली तर जिवे ठार मारन्याची धमकी दिली . मात्र सदर महिलेने काल शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन त्या महिलेच्या तक्रारीवरुन सुनिल वाघमारे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करन्यात आला आहे . दरम्यान सुनिल वाघमारे याने त्या महिले सोबत तडजोड करुन हे प्रकरण मिटवन्याचा प्रयत्न केला . परंतु त्या महिलेने सदर प्रकरण मिटवन्यास नकार दिला . तर आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हे समजताच तो नराधम वाघमारे हा पोलिस ठाण्यातुन फरार झाला आहे .

संबंधित पोस्ट