राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष व त्यांच्या बंधूंना मारहाण,आगामी नगरपरिषद निवडणूक लढविण्याची तयारी केली म्हणून आरोपींचा हल्ला .

बदलापूर(प्रतिनिधी) : काल रात्रीच्या सुमारास  राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष रुपेश थोरात व त्यांच्या भावाला आरोपी विरेश धोत्रे , योगेश धोत्रे व अन्य आरोपींनी बेदम मारहाण केली ,थोरात हे आगामी कुळगाव- बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचा राग आरोपींच्या मनात होता,त्यावरून हा हल्ला झाला,या प्रकरणी बदलापूर (पूर्व ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . 

काल  रात्री १०.१५ वा.च्या सुमारास स्टेशन पाडा परिसरात हा प्रकार घडला आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवक पदासाठी होणारी आगामी निवडणूक लढविणार असल्याचा राग मनात धरून विरेश धोत्रे, योगेश धोत्रे व निलेश धोत्रे यांनी रुपेश थोरात त्यांचा भाऊ राहुल व हितेश यांना तुम्ही इलेक्शन कसे लढता प्रचाराला कसे फिरता आम्ही बघतो,अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्याचप्रमाणे सदर मारहाणीत विरेश धोत्रे याने त्याच्या पँटच्या खिशातील कसले तरी लोखंडी हत्यार काढून हातावर मारल्याचे रुपेश थोरात यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात विरेश धोत्रे, योगेश धोत्रे व निलेश धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

संबंधित पोस्ट