राकेश पाटील हत्याकांडातील मुख्य सुत्रधाराला अटक करा अन्यथा पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर उपोषण.
प्रहार जनशक्ती पक्षाचा इशारा.
- by Rameshwar Gawai
- Nov 23, 2020
- 1047 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ मनसे उपाध्यक्ष राकेश पाटील यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे मात्र मुख्य सूत्रधार असलेला बिल्डर अद्याप मोकाट आहे. असा आरोप करून या सुत्रधाराला अटक करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे , या मागणीसाठी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे .
अंबरनाथ शहर मनसे उपाध्यक्ष राकेश पाटील यांची नुकतीच हत्या करण्यात आली होती , पालेगाव, जुने अंबरनाथ गाव या परिसरात लोकांनी लाखो रुपयांच्या सदनिका घेऊन देखील काही बिल्डर नागरी सुविधा देत नव्हते आजही या ठिकाणी पाण्याची समस्या असून पावसाळ्यात रस्त्यांवर व काही इमारतींच्या तळमजल्यात गुडघाभर पाण्याचे तळे निर्माण होते , हा सर्व प्रकार राकेश पाटील यांनी उघडकीस आणल्यानंतर त्यांच्यावर काही गुंडांनी हल्ला करून खून केला . या खुनात एका मोठ्या बिल्डरचा हात असून तोच या खुनाचा सूत्रधार असल्याचा आरोप राकेशच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सुत्रधाराला अटक करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲड स्वप्नील पाटील आणि उल्हासनगर शहर अध्यक्ष प्रधान पाटील यांनी केली आहे .जर खुनाच्या सुत्रधाराला अटक झाली नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त कार्यालय उल्हासनगर समोर लाक्षणिक उपोषण करतील असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे .
काल प्रहार जनशक्ती पक्षाच्या उल्हासनगर कार्यालयात महत्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून पक्षाचे मुख्य प्रवक्ते कमलाकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.आगामी निवडणूक ,आणि पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी मुरबाड , शहापूर , अंबरनाथ , बदलापूर , कल्याण डोंबिवली तसेच उल्हासनगर शहरातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.तर यावेळी उल्हासनगर शहरअध्यक्ष प्रधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे.दूध नाका परिसरातून पवन सचदेव , दुर्गा देवी पाडा विभागातून शिक्षक रुपेश शिर्के तसेच कच्ची पाडा परिसरातून राजू राठोड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य युवकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम