अनैतिक संबंधातून प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सी मधील घटना,ग्रॅन्डरच्या सहाय्याने चिरला गळा .

अंबरनाथ(प्रतिनिधी)औद्योगिक क्षेत्रामधील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या प्रियकराने आपल्या मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवले होते. मात्र या संबंधांना तिच्या पतीने विरोध केल्यानंतर देखील त्यांनी आपले भेटीगाठी सुरू ठेवल्या होत्या. मात्र अचानक दोघांचे मृतदेह अंबरनाथच्या प्रसादम रेसिडेन्सी मध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनी मध्ये अजित शहा आणि संदीप सक्सेना हे दोघे मित्र काम करत होते. मात्र संदीप सक्सेना आणि अजित शहा याची पत्नी जयंती यांचे शारीरिक संबंध सुरू झाले होते. मात्र या संबंधांना जयंतीचे पती अजित शहा यांनी विरोध केला होता. मात्र कालांतराने त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट झाल्याने ते अजित त्याच्या नकळत देखील भेटू लागले. तर  ही महिला १७   तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पतीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात केली होती त्यानंतर गुरुवारी जयंती आणि तिचा प्रियकर संदीप सक्सेना यांचे मृतदेह अंबरनाथमध्ये सापडले आहेत अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सध्या पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संबंधित पोस्ट