किल्ले स्पर्धेत सुयश पाटील तर रांगोळी स्पर्धेत निशा कदम प्रथम.

बदलापूर(प्रतिनिधी) : बदलापूरात आयोजित किल्ले स्पर्धेत एल एस ग्रुपचे सुयश पाटील, रांगोळी स्पर्धेत निशा कदम यांनी तर आकाश कंदील स्पर्धेत दीप्ती भोसले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेचे आयोजक तुषार साटपे व सुवर्णा साटपे यांनी सर्व विजेत्यांचे व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांना घरोघरी जाऊन पारितोषिक वितरण केले.

दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या किल्ले, रांगोळी तसेच आकाश कंदील स्पर्धेत घरोघरी जाऊन परीक्षकांनी पाहणी करून विजेत्यांची निवड केली. किल्ले स्पर्धेत प्रथमेश शिंदे व ग्रुप यांना द्वितीय, स्वराज कर्पे यांना तृतीय क्रमांक मिळाला.विनीत गायकवाड, प्रसाद पाटील, स्वराज सुतार, स्वप्नील डोके, हितेश कासार, गौरव कांबळे, आकाश राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. रांगोळी स्पर्धेत रजनी परदेशी,अनुष्का गायकवाड, श्रीसाई छत्र बिल्डींग यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. मयुरी भोईर, रेखा कलेरिया, लक्ष्मी कडू, तनुजा डोके, सरिता गायकवाड, मानसी सकपाळ, श्रद्धा सुतार, अर्चना खाटोकर, प्रमिला म्हात्रे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. आकाश कंदील स्पर्धेत विकास इनामदार यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.विजय रोडगे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. 

किल्ले साकारणाऱ्या लहान मुलांना किल्यांची माहिती विचारून त्यांनी त्यांनी कश्या प्रकारे किल्ला बनवला, किल्ल्याची माहिती मिळवण्यासाठी कसा अभ्यास केला, किल्ल्यांची वैशिष्ट्ये काय आहेत,याची माहिती मुलांकडून घेण्यात आली व त्यानुसार त्यांना विजेत्यांची निवड करण्यात आली. लहान मुलांना किल्ल्यांची माहिती व्हावी, त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा परिचय व्हावा हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा हेतू असल्याचे तुषार साटपे यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट