विरार:बोगस हौसिंग सोसायटयांच्या,चौकशीचे सहकार मंत्र्यांकडून संकेत
- by Adarsh Maharashtra
- Nov 15, 2020
- 882 views
विरार(दीपक शिरवडकर) : उपनिबंधक सहकारी संस्था,वसई कार्यालयाकडून खोटया-बोगस कागदपत्राने,इमारतीचे बांधकामच अस्तित्वात नसलेल्या जागेत,जागेच्या गाव नमुना दाखल्यातील नोंदी न तपासता,अवैध ठिकाणी खोटया दस्ताने गृहनिर्माण संस्था नोंद करून देण्याचे प्रताप झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गाव मौजे नारंगी, तालुका वसई, जिल्हा पालघर याठिकाणी इमारत अस्तित्वात नसताना तत्कालिन उपनिबंधक,सहकारी संस्था वसई,मा.बजरंग जाधव यांनी सन२०१५ मध्ये नोंदणी क्रमांक TNH-VSI-HSG-(TC)- 27092- 2015 ही हौसिंग सोसायटी नोंद करून दिली.तर तत्कालीन उपनिबंधक प्रियंका गाडिलकर यांनी त्याच नोंदणी क्रमांकाने दस्त न तपासता हौसिंग सोसायटी दुसऱ्या हिस्सा क्रमांकावर सन २०१९ मध्ये नोंद करून दिली आहे.एकाच क्रमांकाने दोन वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या वर्षांत हौसिंग सोसायटया नोंद करण्याचा विक्रम केला गेला आहे.तसेच अन्य काही ठिकाणी कळून सवरून प्रशासनाने अवैधपणे हौसिंग सोसायटया सन २०१९ मध्ये नोंद करून दिल्या गेल्या आहेत.(जागेअभावी अशा सोसायटयांची यादी प्रसिद्ध करता येत नाही.)याबाबतच्या बऱ्याच तक्रारी सहकार विभागाकडे दाखलही झाल्या आहेत.
अशा सोसायटयांच्या जागेत कार्यकारी मंडळ निवडली गेली आहेत.कार्यकारी मंडळ निवडताना नेमलेले निवडणूक अधिकारी सहकार सल्लागार निवडणूक लढविणाऱ्या सभासदांची निवडणूक कायद्यानुसार कोणतीही वैयक्तिक-वैवाहिक,क्रिमिनल-शैक्षणिक-जातीय व अन्य माहिती नोंद करून न घेता कामात बेजाबाबदारपणा दाखवत निवडणुका घेतात व वरिष्ठांना खोटे अहवाल देतात.तसेच लेखापालही खोटया माहितीचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल पैनलवरील ऑडिटरकडून स्विकारतात.अशी काही प्रकरणे न्याय प्रविष्ट झाली असल्याचे समजते.तर याबाबत राज्याच्या सहकार विभागाकडे तक्रारी दाखल झाल्यामुळे याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे संकेत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून दिले जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील अंदाजे १८० इमारती कधीही कोसळू शकतात,तर ५६३ इमारती धोकादायक असल्याची नोंद आहे.तर उपनिबंधक,सहकारी संस्था,वसई कार्यालयाकडून सन २०१८ पर्यंत अंदाजे ६०२८ गृहनिर्माण सोसायटया नोंद करून दिल्या गेल्या आहेत. यापैकी बोगस व खोटया कागदपत्राने,बेकायदा बांधकामाच्या ठिकाणी,कामात बेजबाबदारपणा दाखवत संशयास्पदरित्या किती हौसिंग सोसायटयांची नोंदणी झाली आहे. याचा थांगपत्ता नाही.
प्रशासनाकडून खोटया व बोगस कागदपत्राने नोंदित झालेल्या हौसिंग सोसायटयांमुळे सदनिकाधारकांची, वित्तीय बँकाची,पालघर जिल्हा फेड्रेशन,पंतप्रधान आवास अनुदान योजना,विविध आस्थापना याची फसवणूक होत आहे.या सर्व प्रकरणाची सहकार मंत्र्यांनी उच्चस्तरीय चौकशी करावीच व बेजबाबदार कामे करणाऱ्यांवर कारवाई करावी असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम