गुन्हेगाराला अटक होणे हा पत्रकारितेवर हल्ला कसा?

प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते पण या क्षेत्रात आजकाल काही चोर, लफंगे, ब्लॅक मेलर, खुनी, बलात्कारी यांची घुसखोरी वाढल्यामुळे लोकांचा पत्रकारिता आणि पत्रकारांवरचा विश्वास उडाला आहे. पत्रकारिता म्हणजे सत्य! पत्रकारिता म्हणजे संयम!पत्रकारिता म्हणजे निःपक्षपाती भावनेने एखाद्या घटनेचे केलेले वृत्तांकन आणि त्यातून अन्यायग्रस्त पीडित माणसाला मिळवून दिलेला न्याय! याला पत्रकारिता म्हणतात. पत्रकारिता म्हणजे मोठ मोठ्याने ओरडून हातवारे करून केलेला आक्रस्ताळेपणा म्हणजे पत्रकारिता नाही! पत्रकार हा बुद्धिजीवी असतो त्यामुळे प्रत्येक घटनेकडे त्याने चिकित्सक नजरेने बघून दोन्हीकडच्या बाजू तपासून नंतरच त्यावर आपले मत व्यक्त करायचे असते. पण त्यासाठी बुद्धी असावी लागते, विविध क्षेत्रांचा अभ्यास असावा लागतो आणि मुख्य म्हणजे भाषेचे ज्ञान आणि आपण काय बोलतोय, त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची समज असावी लागते. स्वतःच्या स्टुडिओत बसून कॅमेरा समोर पिसाळलेल्या कुत्र्या प्रमाणे भुंकणाऱ्या येड्या गबाळ्याला पत्रकार म्हणता येत नाही. कारण ज्या माणसाला पत्रकारितेचे ज्ञान नसते तो बेछूट वागत असतो. पत्रकारिता म्हणजे कोणावरही कसेही आरोप करण्याचा आपल्याला मिळालेला परवाना आहे त्यामुळे आपण कसेही वागलो तरी पत्रकारितेच्या कवचाखली सुरक्षित राहू शकतो असा ज्या लोकांचं समज आहे अशापैकीच एक आहे रिपब्लिकन चॅनलचां मालक आणि स्वयंघोषित पत्रकार अर्णव गोस्वामी! मग अशा माणसाने एखादा गुन्हा केला आणि त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली तर तो पत्रकारितेवरचा हल्ला कसा काय होऊ शकतो? उलट असे लोक जे पत्रकारितेवर कलंक आहेत .ज्यामुळे संपूर्ण मीडियाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे अशा लोकांवर कारवाई व्हायलाच हवी. टीआरपी घोटाळ्यात अडकलेल्या अर्णबने पत्रकारितेचा आणि आणि पत्रकारितेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा कसा गळा कापला हे टीआरपी घोटाळ्यातील सगळ्या देशवासीयांनी पाहिले आहे आणि आता तर त्याला एका आत्महत्येच्या प्रकरणात चौकशी साठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशावेळी त्याच्यासाठी जे लोक छात्या बडवत आहेत ते महाराष्ट्राचे आणि कायद्याचे सुद्धा शत्रू आहेत. कारण अर्णबमुळे ५ मे २०१८ साली एका मराठी इंटेरिअर डेकोरेटर आत्महत्या केली होती होती. अर्णबने  त्याचे ८३ लाख रुपये बुडवले होते त्यामुळे अन्वय नाईक नावाच्या त्या व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आणि सुसाईड नोट मध्ये तसे त्याने नमूद केले होते मात्र त्यावेळी पोलिसांनी नाईक कुटुंबियांच्या फिर्यादीची दखल घेतली नाही पण नाईक यांच्या पत्नीने न्यायालयात धाव घेतली तेंव्हा न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यामुळे पोलिसांनी अर्णबला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे चौकशीत तो जर निर्दोष आढळला तर त्याला सोडून देतील पण त्याच्या अटकेमुळे सरकारने प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी केली असे कसे म्हणता येईल. एरव्ही कायद्याचा आदर राखण्याचे उपदेश करणारे आणि सुशांतसिंग राजपूत सारख्या परप्रांतीयांच्या आत्म्हत्ये नंतर आकांड तांडव करणारे भाजपवाले आज एका मराठी व्यावसायिकाला त्याच्या मृत्यू नंतर न्याय मिळत असताना कशासाठी पोलिसांच्या आणि सरकारच्या नावाने बोंबाबोंब करीत आहेत? आज खऱ्या अर्थाने त्यांचा महाराष्ट्र विरोधी चेहरा उघडा पडला आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसांनी यांना लक्षात ठेवायला हवे आणि नाईक कुटुंबियांच्या मागे ताकदीने उभे रहायला हवे.

उलट पत्रकारितेत शिरलेल्या अर्णब सारख्या वाचाळ आणि विवेकशून्य लोकांच्या विरोधात सच्चा पत्रकारांनी उभे राहायला हवे आणि पत्रकारिता काय आहे हे समाजाला दाखवून द्यायला हवे. पत्रकारांना कोणताही पक्ष, कोणताही धर्म अथवा कोणताही प्रांत नसतो त्यामुळे पत्रकार कुठल्याही पक्षाची किंवा धर्माची बाजू घेऊन पत्रकारिता करू शकत नाही कारण त्यामुळे सत्यावर पडदा टाकला जातो आणि असत्याची पाठराखण केली जाते आणि हे पत्रकारितेच्या विरूद्ध आहे तरीही काही मोठे चॅनलवाले सध्या सत्ताधाऱ्यांच्या मस्तकावर छत्री धरून त्यांच्या मागे मागे फिरत आहेत त्यामुळे सत्ताधारी म्हणतील ती पूर्व दिशा आणि तेच अंतिम सत्य असे त्यांच्या चॅनल वरून दाखवत आहेत आणि अर्णब सारख्या सूपारीबाज तर सत्ताधाऱ्यांचे गुलाम बनून त्यांची सेवा करीत आहेत म्हणून तर त्याच्या अटकेनंतर हा पत्रकारितेवर हल्ला असल्याचा कांगावा केंद्राकडून सुरू झाला. जबाबदार केंद्रीय मंत्री अर्णबच्या समर्थनार्थ पुढे आले. आता काय म्हणावे या लोकांना? सरकार मध्ये बसलेले उच्च पदस्थ लोकच जर अर्णब सारख्या माथेफिरू माणसाच्या पाठीशी उभे राहू लागले तर या देशातील बोगस पत्रकारितेला एक नवा आत्मविश्वास मिळू शकतो आणि या क्षेत्रात जे सच्चे, बुद्धिवादी पत्रकार आहेत त्यांना हे क्षेत्र सोडण्यावाचून गत्यंतर नाही.अशा स्थितीत अर्णब सारख्या लोकांवर लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाची विश्वासार्हता खरोखरच टिकून राहील का? मुळात कुठल्याही क्षेत्रातला माणूस कितीही मोठा असो कायद्या समोर तो इतरा प्रमाणेच सर्वसामान्य असतो अशावेळी त्याच्यासाठी सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी पुढाकार घेणे, त्याची पाठराखण करणे हा एक प्रकारे कायद्याचा अपमान आहे .दुसऱ्याला कायद्याची बुज राखण्याचा उपदेश करायचा आणि स्वतः मात्र कायद्याची पायमल्ली करायची हे आता नेहमीचेच झालेलं आहे त्यामुळेच समाजातील अपप्रवृत्तींना प्रोत्साहन मिळते आणि देशात गुन्हेगारी वाढते .त्यामुळे हे कुठेतरी थांबायला हवे तरच हा देश आणि या देशातील लोकशाही वाचेल अन्यथा कठीण आहे!

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट