
बदलापूरात रोजगार मेळाव्याला तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद.
१४० उमेदवारांना 'ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर'
- by Rameshwar Gawai
- Nov 01, 2020
- 1157 views
बदलापूर(प्रतिनिधी): बदलापूरात शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला तरुण- तरुणींचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. या दोन दिवसीय मेळाव्यात पहिल्याच दिवशी नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी १४० जणांना विविध कंपन्या, बँका आदींकडून नोकरीसाठी 'ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर 'देण्यात आले.
शिवसेना बदलापूर शहर शाखेच्या वतीने शनिवारी बदलापूरातील बॅरेज रोड परिसरात दोन दिवसीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गोदरेज, डिश टीव्ही, रिलायन्स, एयरपोर्ट, झी मराठी मार्केटिंग, सोनी मॅक्स, टाटा, हिंदुस्थान टाइम्स, ऍक्सिस बँक, एचडीएफसी, हुंदाई हॉस्पिटल, विप्रो,अमेझॉन,फ्लिपकार्ट, पतंजली, डी मार्ट आदी सुमारे ५० नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात १५०० तरुण तरुणींनी नावे नोंदणी केली आहे. त्यामध्ये दहावी--बारावीपासून विविध शाखांच्या पदवीधर उमेदवारांचा समावेश आहे. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या विविध कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची तपासणी करून त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर त्यापैकी १४० तरुणांना ऑन द स्पॉट कन्फर्मेशन लेटर 'देण्यात देण्यात आली.रविवारीही सकाळपासून मुलाखती सुरू राहणार असून त्यातूनही उमदेवारांची निवड केली जाणार आहे. युवासेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाधिकारी प्रभुदास देसाई व शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वामन म्हात्रे यांनी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांशी संवाद साधला. जास्तीत जास्त तरुण-तरुणींना व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू,अशी ग्वाही वामन म्हात्रे यांनी यावेळी दिली.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम