लॉकडाऊनमध्येही चार महिन्यात चार हजाराहुन अधिक दाखल्यांचे वाटप.

अंबरनाथ सेतू कार्यालयाची कामगिरी.

अंबरनाथ(प्रतिनिधी) : लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे जुलै महिन्यात शालेय काम-काजासाठी दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन अंबरनाथ सेतू कार्यालयाने ऑनलाईन दाखले देण्याची व्यवस्था केली होती. लॉकडाऊन असतांनाही ऑनलाईन दाखले देण्यासोबत आता लॉकडाऊन शिथील झाल्यावरही दाखले वाटप मोठय़ा प्रमाणात केले जात आहेत. अंबरनाथ सेतू कार्यालयामार्फत गेल्या चार महिन्यात चार हजाराहून अधिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.  

अंबरनाथ तहसिलदारांच्या माध्यमातुन सेतू कार्यालयाचे काम सुरु असुन या सेतू कार्यालयात मोठय़ा प्रमाणात दाखल्यांचे वापट करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारुन अनेक दाखले देण्याचे काम सेतू कार्यालय करित आहे. १ जुलै २०२० पासून २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत ४ हजार १४२ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक उत्पन्नाचे दाखले आहेत. शैक्षणिक सोबत इतर शासकीय कामासाठी दाखल्यांची गरज असल्याने सेतू कार्यालयात गर्दी न करता या सर्व दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. सेतू कार्यालयाने जबाबदारीने काम करित कोणालाही त्रस होणार नाही याची काळजी घेत हे काम केले आहे. उत्पन्नाच्या  दाखल्याचा  आकडा २ हजार ४४१ असुन नॉन क्रिमिलेअर दाखल्यांची संख्या ४७२ आहे. त्याशिवाय ७४६ डोमिसिल दाखले, ८ शपथपत्र, ५८ रहिवासी दाखले, ७० ज्येष्ठ नागरिक दाखले, ५ शपथपत्रासह जातीचे दाखले, ३४०जातीचे दाखले असे एकूण  ४ हजार १४२ दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. दाखले देतांना किंवा अर्ज घेतांना नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जात असल्याने कोरोनाच्या काळात देखील सेतू कार्यालयाचे काम कौतुकास्पद राहिले आहे. तसेच दाखल्यांचे काम जलदगतीने करण्यातही प्रशासनाने मोठा हातभार लावला आहे.

‘‘ सेतू कार्यालयाने लॉकडाऊन असतांनाही जबाबदारीने काम केले आहे. ऑनलाईन अर्जावरुन लवकरात लवकर दाखले देण्याचे काम केले आहे. सर्व कर्मचारी हे जबाबदारीने काम करित असल्याने ते शक्य झाले आहे.- जयराज देशमुख, तहसिलदार, अंबरनाथ.

संबंधित पोस्ट