
अंबरनाथ येथिल शाळांच्या फी सक्तीविरोधात साखळी उपोषण .
- by Rameshwar Gawai
- Oct 27, 2020
- 1222 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) : फी वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी अंबरनाथमध्ये विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारपासून तहसिलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
अंबरनाथमध्ये खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि त्यांच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या फी वसुलीबाबत तगादा लावला जातो, याबाबत गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर मी अंबरनाथकर सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अंबरनाथ तहसिलदार कार्यालया समोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.फी वसुलीबाबत पालकांना फोन करू नये, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये , फी वसुलीबाबत सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या शाळेवर कारवाई करावी आणि अश्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळण्याची सोय करून द्यावी आदी मागण्यांसाठी आगरी सेना , छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, मी अंबरनाथकर सामाजिक संघटना, दीप मित्रमंडळ अश्या विविध संघटनाच्या वतीने आजपासून सुरु केलेल्या साखळी उपोषणामध्ये संजय फुलोरे, सुजाता भोईर, रोहिणी भोईर, यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम