
पालिका कर्मचाऱ्यांना मिळावा २५ हजार बोनस,भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची मागणी.
- by Rameshwar Gawai
- Oct 23, 2020
- 1067 views
बदलापूर(प्रतिनिधी) : कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना यंदा १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात यावा, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता इमाने इतबारे काम केले आहे. हे काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या योगदानाची जाणीव ठेवून नगर परिषद प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर करावा. त्याचप्रमाणे दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली असून कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या किमान १०दिवस आधी बोनस देण्यात यावा, अशी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची मागणी असल्याचे महासंघाचे सेक्रेटरी लक्ष्मण कुडव यांनी सांगितले. यासंदर्भात कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून लवकरच त्यांच्याशी याबाबत चर्चाही करण्यात येणार असल्याचे कुडव यांनी स्पष्ट केले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम