महिलांना लोकल प्रवास नाकारणाऱ्या रेल्वेमंत्र्यांचा अंबरनाथ शिवसेनेतर्फे निषेध.

अंबरनाथ(प्रतिनिधी) :  महिलांना रेल्वे लोकलने  प्रवास नाकारल्याबद्दल केंद्र शासन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा अंबरनाथ शिवसेना महिला आघाडीतर्फे  निषेध करण्यात आला.गर्दीच्या वेळी महिलांना लोकलने प्रवास बंदी करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीच्या शिष्टमंडळाने रविवारी ता.१८ रोजी रेल्वे  स्थानकाचे अधिकारी  ए. के. चौधरी यांची त्यांनी भेट घेऊन  महिलांना लोकलने प्रवास करू देण्याच्या मागणीचे निवेदन दिले. महिला आघाडी शहरप्रमुख मालती पवार, चंदा गान, सविता गावडे, नीता परदेशी, सुप्रिया मालुसरे, सुषमा भागवत, सारिका वाळुंज, रुकसार चौधरी, संजय गावडे, संभाजी कळमकर, प्रकाश डावरे , बाळा मालुसरे, अरुण पुजारी आदी  पदाधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. यावेळी महिलांना रेल्वे लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी नाकारल्याबद्दल मनीषा वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी व निदर्शने करून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचा निषेध करण्यात आला.  

नोकरीला जाताना महिलांना  रेल्वेने प्रवास करण्यावर रेल्वेने निर्बंध आणले आहेत त्यामुळे  नाईलाजास्तव आर्थिक भुर्दंड सोसून बसमधून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे कामावर जाताना आणि घरी येताना महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे , यासाठी महिलांना लोकलने प्रवास करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. त्या मागणीला विरोध करण्यात आल्याने शिवसेनेच्यावतीने निदर्शने करण्यात आल्याचे मनिषा  वाळेकर यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट