अंबरनाथ येथे रोजगार, निवाऱ्याच्या मागणीसाठी अंध बांधवांची निदर्शने .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : शासनाने रोजगार आणि हक्काचा निवारा द्यावा या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंबरनाथ तालुक्यातील अंध बांधवानी  तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने केली.

नॅशनल फेडरेशन ऑफ व्हिज्युअल  एम्पेड परसन्स संघटनेच्या माध्यमातून अंध बांधवानी  जागतिक अंध दिनी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा आणून निदर्शने केली. मोठ्या संख्येने अंध बांधव यावेळी उपस्थित होते.  

रेल्वेमध्ये विविध वस्तूंची विक्री करून अनेक अंध बांधवांचा उदरनिर्वाह सुरु होता. मात्र लॉकडाऊनमुळे  सध्या लोकलमधून प्रवास करण्यावर सर्वसामान्यांवर निर्बंध असल्याने या अंध बांधवाना लोकल प्रवास करणे शक्य होत नसल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. भाडे तत्वावरील   घरांमध्ये रहात असल्याने अनेक अंध बांधवांची घरभाडेही थकली  आहेत. त्यामुळे सामाजिक न्याय केंद्रामार्फत रोजगार केंद्रांची निर्मिती करून दरमहा रोजगार मिळावा तसेच हक्काचे घर मिळावे,अशी या अंध बांधवांची मागणी आहे.  यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट