एम आय डी सी कडुन सैनी इंडस्ट्रीजला एम आर टी पी ची नोटीस,तरी पण अनधिकृत बांधकाम सुरु .
- by Rameshwar Gawai
- Oct 12, 2020
- 932 views
अंबरनाथ(प्रतिनिधी): अंबरनाथ येथिल मलंग गडाच्या तावली पहाडातुन उगम पाहुन रेल्वे प्रशासन निर्मित जी आय पी आर डॅम मधुन वाहणाऱ्या वालधुनी नदी च्या काठावर बेकायदेशीर पणे अनधिकृत भिंत बांधुन नदीचे पात्र लहान करणाऱ्या सैनी इंडस्ट्रीज या कंपनीला एम आय डी सी ने एम आर टी पी ची नोटीस देवुन सुध्दा त्या कंपनीने अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले आहे .
सैनी इंजिनियर वर्क्स कंपनी प्लॉट न .ई ८ /१ आणि कोहली इंडस्ट्रीज कंपनी एफ ८८ /१ आनंदनगर अतिरिक्त एम आय डी सी अंबरनाथ या दोन कंपन्यानी वालधुनी नदी वर बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम सुरु केले आहे . यानी नदी पात्रातच स्लॅब टाकुन , लांबची लांब आणि उंच अशी भिंत बांधलेली असुन स्व:ताच्या वापरा करिता पूल सुध्दा बांधला आहे . दरम्यान ऐवढेच नसुन चेकडॅम बांधुन पाणी रोखन्या करिता आणि नदी चे पाणी हे पाईपलाइन द्वारे घेवुन पाण्याचा उपसा करन्याचे काम देखिल जोरात सुरु आहे .
एम आय डी सीचे मुख्य कार्यालय आनंदनगर अंबरनाथ येथे असुन त्या विभागाचे उप अभियंता डी. एम बिजाली यानी सैनी इंडस्ट्रीज ला पत्रव्यवहार करुन सांगितले आहे कि जे ही बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम हे नदीच्या पात्रात सुरु असुन त्या बांधकामाला एम आय डी सी ची कोणती ही परवानगी न घेता सुरु केले आहे . तेव्हा एम आय डी सी ने या अनधिकृत बांधकामाला रोखन्या साठी एम आर टी पी ॲक्ट १९६६ नुसार सैनी इंडस्ट्रीजला नोटीस बजावली आहे,
परंतु एम आय डी सी ने सैनी इंडस्ट्रीज ला एमआरटीपीच्या कारवाई ची नोटीस देवुन सुध्दा सदर अनधिकृत बांधकाम सुरुच आहे दरम्यान या अनधिकृत बांधकामाची दखल प्रांत अधिकारी व तहसिलदार यानी सुध्दा घेतली आहे . तर लवकरच या बांधकामावर कारवाई होणार असल्याचे संकेत प्रांत अधिकारी यानी दिले आहेत
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम