अंबरनाथ मध्ये मित्राने केली मित्राची हत्या

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ पुर्व येथिल बी कॅबिन रोडवर काल रात्री एका मित्राने आपल्याच मित्राचा जुन्या भांडणाच्या रागातुन हत्या केल्याची घटना घडली असुन हत्या करणाऱ्या मित्राला शिवाजी नगर पोलिसानी एकाच दिवसात बेड्या ठोकल्या आहेत . 

अंबरनाथ पुर्व येथिल दत्तकुटिर राहुल नगर मध्ये राहणाऱ्या आशुतोष उर्फ डक्या अविनाथ कराळे याचे स्वामीनगर अंबरनाथ पश्चिम येथे राहणाऱ्या अमन कादर शेख (१८) याचे सोबत तीन दिवसा पुर्वी भांडण झाले होते . तेव्हा अमन ला आशुतोष याने शगुन बार बी कॅबिन रोड येथे बोलवले . आणि त्याच जुन्या भांडणाचा राग काढुन आशुतोष याने अमन च्या पोटात चाकुने  वार करुन त्याची हत्या केली . दरम्यान या हत्ये बाबत आसिफ सलिम शेख याने आशुतोष विरुध्द शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . तर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसानी आशुतोष यांच्यावर कलम ३०२ . ३४ .३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन त्याला एका दिवसातच अटक केली आहे . या गुंह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक जे बी भोयर हे करत आहेत .

संबंधित पोस्ट