शॅडो मंत्रालय !

लोकशाही शासन पद्धतीत निवडणुकांच्या माध्यमातून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे सरकार बनते या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा असतात त्यात प्रामुख्याने अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार आणि सुरक्षा या प्रमुख गरजांचा समावेश असतो मात्र लोकांच्या या प्राथमिक गरजाही जेंव्हा सरकारकडून पूर्ण होत नाही आणि याबाबत अनेक वेळा सरकारकडून मागण्या करूनही सरकार त्याकडे लक्ष देत नाही तेंव्हा लोकांना पर्याय शोधण्याची आवश्यकता वाटू लागते मग तो पर्याय कायदेशीर असो अथवा बेकायदेशीर लोकांसाठी फक्त तो विश्वसनीय असावा लागतो .१९६६ साली शिवसेना प्रमुखांनी जेंव्हा सेनेची स्थापना केली त्यानंतर सुरवातीला मुंबई ठाण्यात ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखा उभ्या राहिल्या त्या शाखांमधून लोकांना मदत मिळू लागली अर्थात या शाखांना तशी कोणतीही कायदेशीर मान्यता नव्हती तरीही लोक या शाखांमध्ये आपल्या समस्या घेऊन जायचे आणि लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम त्या शाखांमधून केले जायचे. त्यामुळे घरगुती भांडणांपासून ते कारखान्यातील कामगारांच्या न्याय हक्का पर्यंतची प्रकरणे शिवसेनेच्या शाखांमध्ये सोडवली जायची त्यामुळे लोक पोलिसांकडे किंवा न्यायालयात न जाता या शिवसेनेच्या शाखांमध्ये जायचे कारण त्यांना विश्वास असायचा की आपली समस्या निश्चितपणे इथे सुरू शकेल. वास्तविक लोकांमध्ये असा विश्वास निर्माण करण्याचे काम सरकारचे असते पण सरकार जेंव्हा लोकांच्या प्रश्नांवर अपयशी ठरते तेंव्हा मग लोकांमधूनच अशा पर्यायी व्यवस्था निर्माण होतात अर्थात हा पर्याय लोकशाही शासन व्यवस्थेसाठी कायदेशीर दृष्ट्या भलेही योग्य नसला तरी लोकांच्या दृष्टीने मात्र सोयीस्कर आणि फायदेशीर ठरत असतो त्यामुळे लोकांचा सरकार पेक्षा अशा पर्यायांवर अधिक विश्वास असतो. सध्या मनसेचे शॅडो कॅबिनेट असेच चर्चेत आहे आणि त्याही पेक्षा अधिक चर्चेत आहे ते सध्या शॅडो मंत्रालय बनलेले राज ठाकरेंचे कृष्णकुंज निवासस्थान! आजकाल कृष्णकुंज वर लोकांची गर्दी वाढतेय. मग तो महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे उघडण्याचा मुद्दा असो . मुंबईची लोकल ट्रेन सर्वांसाठी खुली करण्याचा मुद्दा असो की कोळी महिलांच्या उपजीविकेच्या आड येणाऱ्या परप्रांतीय मासेविक्रेत्यांचा मुद्दा असो ! हे सगळे मुद्दे घेऊन लोक सरकारकडे जाण्याऐवजी राज ठाकरेंकडे जात आहेत .त्यामुळे लोकांना राज ठाकरें विषयी इतका विश्वास का वाटतोय याचा विचार राज्याच्या सत्तेत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांसह प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही करायला हवा. आज राज ठाकरेंकडे काय आहे? विधिमंडळात त्यांचा फक्त एक आमदार आहे तर राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतके त्यांचे लोक प्रतिनिधी आहेत याउलट काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा यांच्याकडे पैसा आहे, पॉवर आहे त्यांच्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे तरीही त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही त्यामुळे लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात नाही ज्या शिवसेनेच्या शाखा पूर्वी गोरगरीब कामगार, फेरीवाले, झोपडपट्टीवासी यांच्या समस्या सोवण्यासाठी एक हक्काचं आश्रयस्थान बनल्या होत्या त्या आता बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचे सेटलमेंट आणि लेण देणं चे अड्डे बनले आहेत त्यामुळे तिथे आता सर्वसामान्य गरीब माणूस आपल्या समस्या घेऊन जात नाही कारण तिथे आता दत्ताजी साळवी नाहीत तिथे प्रमोद नवलकर नाहीत तिथे आनंद दिघे नाहीत तिथे सुधीरभाऊ नाहीत आणि मुख्य म्हणजे शिवसेनेच्या शाखा ची जबाबदारी सांभाळून लोकांमध्ये या शाखांविषयी पूर्वीच्याच विश्वास कायम ठेवणारे शाखाप्रमुख नाहीत आणि या सर्वांवर वचक ठेवणारे शिवसेना प्रमुख आज हयात नाहीत त्यामुळेच आज सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या कायदेशीर कॅबिनेट पेक्षा कोणतेही कायदेशीर अधिकार नसलेले मनसेचे शॅडो कॅबिनेट आणि राज ठाकरेंचे शॅडो मंत्रालय बनलेले कृष्णकुंज लोकांना अधिक विश्वसनीय वाटतेय म्हणून लोक तिथे जातात. बाळासाहेबांनी सत्ते मध्ये नसतानाही जो लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता तोच विश्वास आज राज ठाकरेंनी निर्माण केला आहे म्हणून लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात कोरोनाच्या या संकट काळात सुद्धा मनसेचे शॅडो कॅबिनेट आणि शॅडो मंत्रालय सक्रिय आहे तर दुसरीकडे उध्दव ठाकरे फक्त लोकांना टिव्ही वरच दिसत आहेत. एक जमाना असा होता की बाळासाहेबांच्या काळात आंधळा माणूसही बरोबर वाट काढीत मातोश्रीवर यायचा, आज लोक उध्दव ठाकरेंचा पत्ता विचारतायत. शिवसेनेत झालेला हा बदल महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताचा निश्चितच नाही. ते काही असो शिवसेना जरी बदललेली असली तरी मनसे आणि राज ठाकरे मात्र आजही मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत मनसेच्या स्थापनेच्या वेळी जी त्यांची भूमिका होती ती आजही कायम आहे. त्यांच्या आजवरच्या भाषणांमध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचे होते आणि उशिरा का होईना लोकांना ते पटायला लागलेत त्यामुळेच लोक त्यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन जात आहेत आणि तेही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारी दरबारी पाठपुरावा करीत आहेत या उलट सत्तेत असतानाही  जी गत आज शिवसेनेच्या शाखांची आहे तीच गत काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यालयांची आहे. ती ओस पडलीत, तिकडे कोणी जात नाहीत त्यामुळे  आपण सत्तेत असतानाही लोक आपल्याकडे का येत नाहीत याचा विचार काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करायला हवा. राहता राहिला प्रश्न प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा! तर त्यांच्या विषयी एका ओळीत सांगायचे झाल्यास महाराष्ट्रासाठी ते परप्रांतीय आहेत .कारण सुशांतचां आत्महत्येच्या प्रकरणात त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली त्यामुळे त्यांना महाराष्ट्रा विषयी बोलण्याचा अधिकारच राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे लोक आपली समस्या घेऊन का जातील ते तर महाराष्ट्राचे शत्रू आहेत! बाळासाहेबांचे बोट धरून आले त्यांच्या कृपेने महाराष्ट्रात वाढले आणि आज शिवसेनेच्या उरावर बसले एवढीच त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे .हा मोदींना मात्र महाराष्ट्र विसरणार नाही कारण त्यांनी आमच्या अकाउंट मध्ये टाकलेले १५ लाख रुपये अजून खाऊन संपलेले नाहीत त्यामुळे त्यांच्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र २०२२ च्या लोकसभेच्या निवडणुकीची आतुरतेने वाट बघतोय .या सगळ्या गोष्टी पाहता आता तरी महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेने डोळे उघडावे आणि कोण आपला आणि कोण परका याचा विचार करूनच या पुढील दिशा ठरवावी.

कारण राजकीय लोक जनतेला गृहीत धरून चालतात म्हणून त्यांचं सरकार आले तरी ते लोकांची कामे करीत नाहीत कारण त्यांना ठाऊक असत की आपला मतदार आपल्या पासून कुठेही जाणार नाही आणि म्हणूनच त्यांच्या याच फाजील आत्मविश्वासास तडा देण्याची वेळ आली आहे. सत्ता किंवा कोणतेही अधिकार हाती नसताना जो आपल्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ करतो तो सत्तेत आल्यावर निश्चितपणे आपल्या जीवनाला चांगली दिशा देऊ शकतो. आपले जीवन सुखमय करू शकतो त्यामुळे अशाच माणसाच्या हाती सत्ता सोपवण्यात आपले आणि महाराष्ट्राचे हित आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट