
मनसेने केला आशा सेविकांचा सन्मान .
- by Rameshwar Gawai
- Oct 06, 2020
- 1112 views
बदलापूर(प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात कार्यरत राहून योगदान देणाऱ्या आशा सेविकांना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन बदलापूर मनसेच्या वतीने गौरविण्यात आले.
यावेळी मनसे महिला शहराध्यक्ष संगिता चेंदवणकर सचिव कांचन मांडवगडे यांच्यासह मंदा साळवी, हेमा स्वामी विजया .लक्षमी पिल्लई, अपर्णा पेडणेकर धनश्री कविता, वृषाली शिंदे,संगिता पाटील, संगिता बुरले, भावना तांदुळे,कविता यादव सरिता गाडे,श्वेता लाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात आशा सेविकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत दिलेले योगदान मोलाचे आहे. त्या कोविड योद्धा आहेत. त्यामुळे त्यांना मनसेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आल्याचे संगीता चेंदवणकर यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम