अंबरनाथ येथिल ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हाॅस्पिटलमध्ये कोविड केअर सेंटर सुविधा उपलब्ध .

अंबरनाथ(प्रतिनिधी) :   राज्य शासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोंबर  २०२० या कालावधी मध्ये राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अनेक खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. नव्याने आढळणा-या वाढत्या रूग्णांना शहरातच योग्य त्या वैद्यकीय सोयी सुविधासह संभाव्य वाढता रूग्ण वाढीचा धोका पाहता नियोजनात्मक स्वरूपात केद्रीय आयुध निर्माणी, ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हाॅस्पिटलमध्ये अंबरनाथ नगरपालिका संचालित  कोव्हिड केअर सेंटरचे उदघाटन आयओएफएसचे जनरल मॅनेजर एस.के.सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले.

अंबरनाथ नगरपालिका संचालित डेंटल रूग्णालय, सिटी हाॅस्पिटल या व्यतिरिक्त अन्य रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार व्यवस्था केली जात आहे. त्यात भर घालत अंबरनाथ मधील ऑर्डनन्स फॅक्टरीच्या हाॅस्पिटलमध्ये पालिकेचे कोविड केअर सेंटर शनिवारी २५ सप्टेंबरला सुरू करण्यात आले. यावेळी आयओएफएसचे जनरल मॅनेजर एस. के. सिन्हा, ऑर्डनन्स हाॅस्पिटलच्या सीईओ डाॅ.रुक्मिणी राणा, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रदिप पाटील, राष्ट्र्वादी काॅग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, माजी नगरसेवक मनोज देवडे, प्रशासक जगतसिंग गिरासे, मुख्याधिकारी डाॅ. प्रशांत रसाळ, नोडल आफिसर डाॅ. नितिन राठोड, डाॅ. निवेदिता, आरोग्य अधिकारी सुरेश पाटील, अभियंता राजेश तडवी, विशाल राठोड आदी उपस्थित होते.

अंबरनाथ शहर कोरोना मुक्त’ करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत नारिकांनी कोरोनाची भिती मनातुन काढुन टाकली पाहिजे. नियमित मास्क, सॅनिटायझर, गर्दी टाळुन विनाकारण घराबाहेर न पडता वाढता सामुहिक संसर्ग कसा टाळता येईल याची प्रत्येकांनी खबरदारी घेणे आज गरजेचे आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे पाप-पुण्य, कमीपणाच्या अंधभावनेतुन बाहेर पडून पॉझिटिव्ह -निगेटीव्ह, काॅरन्टाईनची मानसिकता बदलली पाहीजे. प्रत्येकांने आरटीपीसीआर वा अँटीजेन टेस्ट करून घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला तर नक्कीच ' अंबरनाथ शहर कोरोना मुक्त होईल ' असा मनोदय राष्ट्र्वादी काॅंग्रेस शहराध्यक्ष 

तथा माजी बांधकाम सभापती सदाशिव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

अंबरनाथ शहरात कोरोनाचा कहर  ६ हजार २५९ रूग्ण संख्येवर  जावुन पोहोचला आहे. यापैकी ५ हजार ६५६ रूग्ण उपचारार्थ बरे होण्याची टक्केवारी ९०.३६ वर पोहोचली आहे. तर विद्यमान रूग्ण संख्या ३७३ इतकी आहे.गेल्या पंधरा दिवसात ७३३ नवीन रूग्ण आढळुन आले असुन २४ जणांचा मृत्यु झाला आहे. आजपर्यंत २३० जणांचा मृत्यु झाला असून मृत्युदर ३.६७ टक्केवर आला आहे. अंबरनाथ नगरपालिका संचालित डेंटल रूग्णालयात आजवरची रूग्णांची संख्या  २ हजार ७५१ असुन आतापर्यत २ हजार ६५६ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विद्यमान उपचारात रूग्णसंख्या ९० असुन ४ जणांचा मृत्यु झाल्याचा आकडेवारी आलेख प्रसिध्द पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट