मोरीवली,वडवली गावाला रासायनिक प्रदुषणाचा धोका.
- by Rameshwar Gawai
- Oct 01, 2020
- 1851 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ शहराच्या मध्यभागी असलेल्या मोरीवली आणि वडवली या दोन केमिकल झोनमध्ये आता कारखानदार चुकीच्या पध्दतीने रासायनिक वायू हवेत सोडत आहेत. त्यामुळे रासायनिक प्रदुषणाचा फटका या भागातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.या वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत.
गेल्या महिन्यात अंबरनाथ वडवली गावातील केमिकल झोनमधील एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणात धुर सोडण्यात आला होता. त्यामुळे अंबरनाथ भागातील साई सेक्शन, कानसई सेक्शन, स्वामीनगर आणि वडवली गाव परिसरातील नागरिकांना त्याचा त्रस सहन करावा लागला होता. हा प्रकार घडल्यानंतर रात्रीच्या वेळेत रासायनीक वायू सोडण्याचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा असतांना आता नव्याने वायू हवेत सोडण्याचे प्रकार वाढले आहे. मोरीवली गावाच्या परिसरात असलेल्या केमिकल झोनमधील काही कारखानदार चुकीच्या पध्दतीने थेट हवेत वायू सोडत असल्याची बाब ग्रामस्थांनी समोर आणली आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देत नसून या
कारखानदारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर मेहरबानी दाखविण्याचे काम अधिकारी करित असल्याचा आरोप मोरीवलतील ग्रामस्थांनी केला आहे. दुर्गंधीयुक्त वायू हवेत सोडण्याचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
हीच परिस्थीत वडवली भागात देखील झाली आहे. या ठिकाणी देखील नागरिकांच्या तक्रारींना बगल देण्याचे काम केले जात आहे. या दोन्ही गावात रात्रीच्या वेळी दुर्गंधीयुक्त वायुचे प्रमाण येवढे वाढलेले असते की हा संपूर्ण परिसत धुरात साडपल्याचा भास होतो. त्यामुळे अशा प्रदूषणकारी कारखान्यांना समज देण्याची मागणी मोरीवलीच्या ग्रामस्थांनी केली आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम