हाथरसच्या लेकीला' बदलापूरकरांची श्रद्धांजली.

बदलापूर(प्रतिनिधी) : उत्तर  प्रदेशातील हाथरसमध्ये अमानुष अत्याचाराचा बळी ठरलेल्या तरुणीला बदलापूरात काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

बुधवारी रात्री ८ वा. च्या सुमारास बदलापूर पूर्व भागात स्टेशन परिसरात मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच माणुसकीला कलंक असलेल्या या घटनेचा निषेध करून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष हितेश थोरात,महिला काँग्रेसच्या मुरबाड विधानसभा अध्यक्ष नीरजा आंबेरकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रंजन एडवनकर, अभिषेक घोडके, सनी भानुसगरे, आशा शहा, आशा कदम, पृथ्वीराज बावीकर आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट