अंबरनाथ तहसिल कार्यालयातील कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी निदर्शने .

अंबरनाथ(प्रतिनिधी) : अंबरनाथ तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काल  आपल्या  विविध मागण्यांसाठी निदर्शने करून केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विषयक धोरणाचा निषेध केला आहे . त्याचप्रमाणे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारी राष्ट्रीय निषेध दिन पाळण्यात आला.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी-निम सरकारी- चतुर्थ श्रेणी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या १२ मागण्यांसाठी निदर्शने केली यात जुनी पेन्शन योजना लागू करावी,बक्षी समितीचा खंड-२ तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावा, महागाई भत्ता दिवाळी पूर्वी देण्यात यावा, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती विनाअट करण्यात यावी,सर्व रिक्त पदे भरण्यात यावीत, सेवावृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे, केंद्राप्रमाणे भत्ते मिळावेत, खाजगीकरण कंत्राटी धोरण रद्द करण्यात यावे, कोणालाही जबरदस्तीने सेवावृत्त करण्यात येऊ नये, राज्यासाठी स्वतंत्र वेतन आयोग नेमावा,राज्याला वस्तू व सेवा कराची रक्कम तात्काळ देण्यात यावी,सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यात याव्यात अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.

संबंधित पोस्ट