
अंबरनाथ विधान सभा क्षेत्रातील वाढत्या प्रदूषण समस्या संदर्भात मंत्रालयात निवेदन सादर .
- by Rameshwar Gawai
- Sep 29, 2020
- 503 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिन्या पासून अंबरनाथ शहर व आजू बाजूच्या परिसरात , विशेषतः अंबरनाथ पूर्वेतील बी केबिन रोड , वडवली , निसर्ग सोसायटी या परिसरात नागरिकांना एम आय डी सी येथील रासायनिक कारखान्यांच्या वायू प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
हा प्रश्न नागरिकांच्या आरोग्यशी निगडित असल्याने सदर कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण कक्षा तर्फे कडक कारवाई करण्याच्या हेतूने काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ विधानसभा समन्व्यक श्री रोहित साळवे यांनी थेट मंत्रालयात व्यक्तीश जाऊन पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे व पर्यावरण मंत्रालयाच्या प्रधान सचिव सौ . मनीषा म्हसकर यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला . परंतु सर्व विभागाची बैठक सुरु असल्याने दोन्ही विभागातील खाजगी सचिवांना निवेदन सदर करण्यात आले , तसेच महसूल मंत्री व काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना देखील सदर विषय येणाऱ्या अधिवेशनात घेण्याचे निवेदन देण्यात आले आहे . ज्या मध्ये प्रामुख्याने प्रदूषण नियम धाब्यावर बसवणाऱ्या कारखान्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम