घणसोलीत महावितरण घेणार इलेक्ट्रीकल आँक्सिजन उपचार घेणा-या रुग्ण नागरीकांचा प्राण
नगरसेवक घनश्याम मढवी यांच्या मुळे वाचविले एक रुगण महिलेचे प्राण
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1241 views
नवीमुंबई (सुनिल गायकवाड) घणसोली गाव विभागात महावितरण कार्यालयाने मनमानी कारभार सुरु केलेला आहे या घणसोली गावात वारंवार तसेच मागील दोन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित झाल्या मुळे ऑक्सिजन'वर असलेले रुग्ण सध्या स्थितीला जगतील कि मरतील आशी परिस्थिती घणसोली गावात निर्माण झाली आहे.
संपदा ताबे. वय वर्षं (40) हि महिला इलेक्ट्रिकल आँक्सिजन द्वारे गेल्या काही महिन्यापासून उपचार घेत आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून या गावात विधुत पुरवठा सुरळीत नसल्याने या महिलेला इलेक्ट्रिकल आँक्सिजन घेत आले नाही तिचा श्वास गुदमरून जात असल्याचे चित्र संपदा ताबे यांच्या घरातील सदस्य पाहात होते. कोरोनाच्या माहामारी मध्ये रुग्णाला कुठल्या रुग्णालयात दाखल करायचे असा प्रश्न संपदा ताबे यांच्या परिवाराला सतावत होता तेवढ्यात या विभागातील नगरसेवक घनश्याम मढवी यांना हि माहीती कळताच घनश्याम मढवी यांनी या तांबे कुटुंबीयाच्या घराकडे धाव घेत संपदा तांबे या रुगण महिलेस आपल्या राहत्या घरी आणुन इलेक्ट्रिकल आँक्सिजन ची सोय करुन दिली गुदमरून मृत्यूमुखी पडणा-या महिलेला घनश्याम मढवी यांनी वेळीच आपल्या घरातील विधुंत उपकरणांची सोय करुन दिल्याने या महिलेचे प्राण वाचले आहे. एवढे करुन नगरसेवक घनश्याम मढवी थांबले नाहीत तर पत्नी ललिता घनश्याम मढवी यांनी सदर महिलेच्या आरोग्याची काळजी साठी घरातच थांबायला सांगीतले गेल्या दोन दिवसांपासून ललिता मढवी या रुगण महिलेची काळजी घेत आहेत
दरम्यान कित्येक दिवसांपासून घणसोली गाव नवी मुंबई परिसरात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असून मागील दोन दिवसांपासून तर कहर झाला आहे त्यामुळे घणसोली गाव परिसर अंधारात आहे.
सदर विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे इलेक्ट्रिकल ऑक्सिजन'वर असणारे रुग्ण यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असून लाईट नसल्यामुळे ऑक्सिजन उपकरण चालू शकत नाही किंबहुना सदर रुग्णांचा श्वास कोंडून त्या ठिकाणी मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही इलेक्ट्रिकल ऑक्सिजन अभावी श्रीमती. संपदा तांबे नावाची महिला गुदमरून मरणासन्न अवस्थेत असल्याचा इलेक्ट्रिकल ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे संपदा तांबे हिच्या पतीने नगरसेवक मढवी यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला व पत्नी गुदमरत आहे असे सांगीतले मढवी यांनी
तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या संपदा ताबे यांची अवस्था बघून तात्काळ सदर महिलस घरी घेऊन गेले व त्या ठिकाणी तिला ऑक्सिजनची व्यवस्था करून दिली त्यामुळे सदर महिलेचे प्राण वाचले असून , सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या या प्रकारामुळे असे कितीतरी रुग्ण असतील ज्यांना हा जीवघेणा त्रास होत आहे.
या बाबत मढवी यांनी उर्जा मंत्री व ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांना पत्र लिहून या विभागातील विधुंत पुरवठ्यावर योग्य मार्ग काढून तो नियमीत सुरळीत राहीला पाहीजे अाशी मागणी केली आहे.
नाही तर तीव्र जनआंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम