विना मास्क फिरणाऱ्या ३० जणांवर कारवाई.

अंबरनाथ(प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करण्याबाबत जनजागृती व आवाहन शासनाकडून, प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतरही अनेक नागरिक विना मास्क फिरत आहेत.  अंबरनाथमध्ये विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. त्याअंतर्गत  मंगळवारी शिवाजी नगर पोलिस व अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाच्या संयुक्त पथकाने विना मास्क 

फिरणाऱ्या ३० जणांवर दंडात्मक कारवाई करून ९००० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई पुढेही सुरु रहाणार असून नागरिकांनी मास्क लावूनच घराबाहेर पडावे असे आवाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट