बदलापूरात पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखले.

बदलापूर(प्रतिनिधी) :शहरातील नागरिक . रुग्ण व  चाकरमानी वर्गाची होत असलेली प्रचंड गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर सेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी  सविनय कायदे भंग आंदोलन करण्यासाठी निघालेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली.

सकाळी १० वा. बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवेश करून लोकलने प्रवास करीत सविनय कायदेभंग आंदोलन करण्याचे बदलापूरतील मनसे पदाधिकाऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार मनसेचे बदलापूर शहराध्यक्ष जयेश कदम, महिला शहराध्यक्ष संगीता चेंदवनकर, माजी शहराध्यक्ष उमेश तावडे, प्रकाश निकम, तालुका संघटक सुदाम कराळे, 

योगेश जाधव, स्नेहा देशपांडे, नंदा पांढरे, कांचन मांडवगडे, रवींद्र मोरे, संदेश मेढे, गणेश पिल्लई, किरण भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते बदलापूर पूर्व भागातील मनसे शहर मध्यवर्ती कार्यालया जवळ एकत्र जमले होते. तेथून हे सर्वजण बदलापूर रेल्वे स्थानकावर जाणार होते. मात्र रेल्वे स्थानकाजवळ येताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी तेथेच ठिय्या आंदोलन करीत रेल्वे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी केली.दरम्यान, या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या ३५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुुटका करण्यात  आली.

संबंधित पोस्ट