
अंबरनाथमध्ये युवक काँग्रेसची निदर्शने .
- by Rameshwar Gawai
- Sep 21, 2020
- 530 views
अंबरनाथ(प्रतिनिधी) कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, जीवनावश्यक वस्तू (संशोधन) विधेयक, हमीभाव आणि कृषीसेवा विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी अंबरनाथमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
सोमवारी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष ऍड. हितेश थोरात,अभिषेक घोडके, जयेश गुरव, आदींनी अंबरनाथ पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त केला. नव्या विधेयकामुळे कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हाती जाणार असून त्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची भीती असल्याने काँग्रेसने या विधेयकांना विरोध केला आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध दर्शविण्यासाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशा नुसार हे आंदोलन करण्यात आल्याचे हितेश थोरात यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम