अंबरनाथ येथिल कंत्राटदाराची ७० लाखाला फसवणुक .

अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ येथिल एका कंत्राटदाराने महादेव कल्याणकर ॲड कंपनीवर विश्वास ठेवुन त्याना जी एस टी सहित प्रोव्हिडंड फंड. कामगार विमा योजना यांचे पैसे भरण्याची जबाबदारी दिली होती . परंतु त्या कंपनीचे काम बघणारा अभिजित सुर्वे याने  एप्रिल २०१८ पासुन ते ऑक्टोंबर २०१९ पर्यंत एक ही पैसा भरला नसल्याचे उघड झाले असुन ७० लाख रुपयाची फसवणुक करणाऱ्या महादेव कल्याणकर ॲड कंपनीचा अभिजित सुर्वे यांच्या वर अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे .

अंबरनाथ पश्चिम येथे राहणारे रामुल हनुमंता उप्पार ६८ हे व्यवसायाने कंत्राटदार असुन त्यांचे काम आय टी सी . या कंपनीत चालत आहे . तर रामुल यांच्या कडे असलेल्या कामगारांच्या  प्रोव्हिडंड फंडाचे पैसे . कामगार विमा योजनेचे पैसे . तसेच प्रोफेशनल टॅक्स . आणि जी एस टी ची रक्कम भरन्याची

जबाबदारी अंबरनाथ येथिल महादेव कल्याणकर ॲड कंपनीचे काम बघणारा अभिजित सुर्वे यांच्या कडे सोपवली होती . परंतु सुर्वे यानी एप्रिल २०१८ ते ऑक्टोंबर २०१९ पर्यंत ही रक्कम शासकिय कार्यालयात जमाच केली नाही.  उलट जी एस टी च्या बोगस पावत्या तयार करुन आय टी सी कंपनीला दिल्या . हा प्रकार कंत्राटदार रामुल उप्पार व आय टी सी कंपनीचे भागीदार यांच्या लक्षात आला . तेव्हा त्यानी

अभिजित सुर्वे यांच्या कडे पैशाची मांगणी करु लागले तेव्हा सुर्वे याने या कंपनीला बॅंक ऑफ इंडिया चे पाच चेक दिले असुन ते चेक सदर कंपनी कडुन जयहिंद बॅंकेत जमा केले असता ते सर्व चेक बॉऊंस झाले आहेत . त्यामुळे आय टी सी कंपनीतील कंत्राटदार  रामुल उप्पार यानी महादेव कल्याणकर ॲड कंपनीचे काम पाहणारा अभिजित सुर्वे याने ७० लाख रुपयाची फसवणुक केली म्हणुन त्याच्या  विरुध्द अंबरनाथ पश्चिम पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली असुन त्यांच्या तक्रारीवरुन अभिजित सुर्वे यांच्या वर

फसणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .या गुंह्याचा पुढिल तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलिस निरीक्षक एन बी करे हे करत आहेत .

संबंधित पोस्ट