माझे कुटूंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत कोकण भवनमध्ये कोरोना चाचणी
- by Reporter
- Sep 10, 2020
- 798 views
नवी मुंबई (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या आवाहनानुसार कोकण भवन इमारतीत विभागीय माहिती कार्यालय, महसूल विभाग आणि नवी मुंबई महानगरपालिका (आरोग्य विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्यासाठी मोफत कोविड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय माहिती कार्यालयात उपायुक्त (सामान्य) श्री.मनोज रानडे, उपायुक्त (विकास) श्री.गिरीष भालेराव, उपायुक्त (करमणूक) श्री. शिवाजी कादबाने यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी (वर्ग-१) डॉ.गणेश धुमाळ, उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, माहिती सहाय्यक श्री. प्रविण डोंगरदिवे उपस्थित होते.
दिवसभरात एकूण १०९ चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी १०२ चाचण्या निगेटिव्ह आल्या व ०७ पॉझिटिव्ह आल्या. पॉझिटिव्ह आलेल्यांना पुढील तपासणीसाठी महानगरपालिका रुग्णालयात पाठविण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी पथक डॉ.रोशनी चव्हाण, डॉ.शगुफ्ता परवीन यांनी यासाठी मेहनत घेतली. या शिबीरासाठी उपस्थित महानगरपालिकेच्या कर्मचा-यांनी सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या होत्या. या शिबीराच्यावेळी सोशल डिस्टींगसह मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यात आला.
तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीमती वनिता कांबळे, सर्वश्री. गंगाराम बांगारा, राम गोंदके, सचिन काळुखे, जितेंद्र यादव, प्रल्हाद अभंग, संजय कोळी यांनी सहकार्य केले. कोकण भवनातील विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचा-यांनी या उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी कोकण विभागातील पत्रकार, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनीही चाचण्या करुन घेतल्या.
रिपोर्टर