शिवरायांचा हतबल महाराष्ट्र
पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी आपल्याच घरात हाल सोसते मराठी
- by Adarsh Maharashtra
- Sep 10, 2020
- 3080 views
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी मराठी माणूस आणि त्याची मराठी भाषा यांचं जे वर्णन केलेलं आहे ते किती जरी अस्वस्थ करणारं असल तरी ती एक वस्तुस्थिती आहे आणि कुठल्याही मराठी माणसाला ती नाकारता येणार नाही. आज परप्रांतीयांच्या समोर मुंबई महाराष्ट्राची हतबलता लपून राहिलेली नाही. कंगना राणावत प्रकरणाने ती अधिकच अधोरेखित केली आहे त्यामुळे आज खऱ्या अर्थाने परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे राज ठाकरे यांच्या सारख्याच प्रखर नेतृत्वाची महाराष्ट्राला तेंव्हाही गरज होती आणि आताही आहे हे मराठी माणसाच्या लक्षात यायला लागले आहे. मनसेची स्थापना झाल्यापासून राज ठाकरे पर प्रांतीय लोकांपासून असलेल्या धोक्याबद्दल त्यांच्या प्रत्येक भाषणातून पोटतिडकीने सांगत होते पण मराठी माणसाने ते फारसे मनावर घेतले नाही. राज ठाकरे पेक्षा कानफुक्या चांडाळ चौकडीने वेढलेले सध्याचे शिवसेना नेतृत्व त्यांना अधिक जवळचे वाटत होते पण शिवसेना नेतृत्व पूर्णपणे व्यावसायिक झालेले असल्याने बाळासाहेबांच्या वेळेचा मराठी बाणा आणि कणखर कणा आजच्या सेना नेतृत्वाकडे तेंव्हाही नव्हता आणि आताही नाही. ज्यांनी शिवसेनेच्या कोणत्याही आंदोलनात भाग घेतला नाही ज्यांनी कधी पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या नाहीत केवळ पक्ष नेतृत्वाच्या xxx तेल लावून पक्षात मोठं होण्याचं, स्वतःच स्थान निर्माण करण्याचं काम केलं अशा लोकांना परप्रांतीयांचा महाराष्ट्रा द्रोह कधी दिसलाच नाही आणि दिसला तरी त्यांनी कधी त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळेच परप्रांतीयांच्या बाबत शिवसेनेचे धोरण दिवसेंदिवस मवाळ होत गेले आणि आज जेंव्हा हेच परप्रांतीय त्यांच्या उरावर बसले तेंव्हा त्यांना शिवरायांचा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आठवायला लागला. आज बाळासाहेब हयात असते तर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर किंवा पाकिस्तान म्हणण्याची कुणाची हिम्मत झाली नसती पण आज शिवसेनेची मजबूरी बघा ती कंगना मुंबई आणि महाराष्ट्रावर कुत्री सारखी भुकते आहे आणि आमचे पक्ष प्रमुख मातोश्री वरून शिवसैनिकांना आदेश देत आहेत की तिच्या विरूद्ध कोणतंही आंदोलन करू नका. काँग्रेस बरोबर सत्तेमधे राहून शिवसेना पक्ष प्रमुखांचाही गांधीजी झाला की काय असे आता वाटायला लागले आहे. अरे पण सत्ता काय आज आहे आणि उद्या नाही पण सत्तेसाठी स्वाभिमान का गहाण ठेवताय ? कंगना सारख्या एका विक्षिप्त बाईला जर एवढे घाबरता तर मग तिचं थोबाड फोडण्याच्या वल्गना कशासाठी केल्या? तिच्या कार्यालयावर कारवाईचा देखावा का केला? होय तो देखवाच होता! कारण कोरोनाच्या संकट काळात ३० सप्टेंबर पर्यंत कोणत्याही बांधकामावर तोडक कारवाई करू नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि या आदेशाची महापालिकेला कल्पना नव्हती का? कारण याच आदेशाचे बेनिफिट घेऊन कंगना ने कारवाईला स्थगिती मिळवली आणि आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगर पालिकेची फजिती झाली. मुंबईचा आणखी एक अपमान झाला आणि याला कारणीभूत आहे अर्थातच शिवसेना! एका बाई कडून अशी फजिती करून घेताना पालिकेतील सत्ताधाऱ्यांना जराही लाज शरम वाटली नाही. मुंबई महापालिकेची कंगना ने केलेली फजिती प्रत्येक मुंबईकर माणसाला आणि खास करून मराठी माणसाला मान खाली घालायला लावणारी आहे. त्याच बरोबर परप्रांतीय मुंबईत किती डोईजड झाले आहेत त्याचा हा धडधडीत पुरावा आहे त्यामुळे आता तरी परप्रांतीयांबाबतची भूमिका बदला पण जोपर्यंत पवारांचे पाणके मातोश्रीचे इअर फोन बनले आहेत आणि त्यांच्या इशाऱ्या वरूनच जोवर सेनेचा कारभार चालणार आहे तोवर आजच्या सेनेत कसलाही बदल घडेल असे वाटत नाही त्यामुळे आता मराठी माणसाने आपलं राजकीय नेतृत्व बदलण्याची गरज आहे कारण आता बाळासाहेबांच्या वेळेची शिवसेना राहिलेली नाही त्यामुळेच इथला परप्रांतीय शिवसेनेला किंवा मराठी माणसाला जुमनायला तयार नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्राला उध्दव ठाकरे यांची नाही तर राज ठाकरे यांची गरज आहे. आज जर मुंबई महाराष्ट्रावर राज ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता असती तर कंगनाला मुंबई पोलिसांवर टीका करण्याची किंवा मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणण्याची हिम्मत झालीच नसती तिने तसे धाडस केले असते तर मनसेच्या रणरागिणींनी तिच्यात मसाला भरला असता आणि त्याच बरोबर आज जे कोणी कंगनाला कडेवर घेऊन नाचत आहेत, तिच्या कार्यालयावर हातोडा पडल्यावर आपला बाप मेल्या प्रमाणे जे छाती बडवून आक्रोश करीत आहेत, जे कंगनाला झाशीची राणी ठरवत आहेत त्या सगळ्यांना काशीला पाठवले असते कारण हे सगळे परप्रांतीयांचे तारणहार आहेत. बाळासाहेबांचे बोट धरून महाराष्ट्रात वाढले तेच आता शिवसेनेच्या समूळ उच्चाटणाचे कारण बनत आहेत त्यामुळे आता मराठी माणसाने शिवसेनेवर विसंबून राहू नये. अजूनही वेळ गेलेली नाही आजच्या हतबल महाराष्ट्राला त्याचा पूर्वीचा स्वाभिमान आणि मराठी बाणा मिळवून द्यायचा असेल तर मनसे आणि राज ठाकरे हाच अंतिम पर्याय आहे. महाराष्ट्रात एक असे सरकार बनवू ज्याला काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्यांची आणि पवारांच्या कारस्थानी मार्गदर्शनाची कधीच आवश्यकता भासणार नाही ते सरकार खऱ्या अर्थाने शिवरायांच्या विचारांचे आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी कटिबध्द असेल आणि त्याच वेळेला महाराष्ट्र मोकळा श्वास घेईल, तो पुन्हा स्वाभिमानाने उभा राहील आणि अशा बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्राचे फोटो काढण्याचे काम उध्दव ठाकरे यांनी करावे कारण ते उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत पण फोटो काढणे आणि प्रत्यक्ष त्या फोटोतला चित्रा प्रमाणे महाराष्ट्र घडवणे यात जमीन आसमानचा फरक आहे जो उध्दव ठाकरेंना निदान या जन्मी तरी कळणार नाही
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम