कोरोना योध्दा' सन्मानपत्राने शिक्षकांचा गौरव.

अंबरनाथ (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अंबरनाथमध्ये भाजपाच्या वतीने जिल्हा परिषद व नगर परिषद शाळेतील शिक्षकांना 'कोरोना योद्धा' सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले,शिक्षक दिनाचे औचित्य साधून अंबरनाथ पूर्वेकडील भाजपा जनसंपर्क कार्यालयात सामाजिक अंतराचे भान राखून शिक्षकांना गौरविण्यात आले. मानवतेच्या भावनेतून शिक्षकांनी कोरोना संकट काळात दिलेले योगदान अनमोल असल्याची भावना भाजपाचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांनी व्यक्त केली.यावेळी भाजपा सरचिटणीस दिलीप कणसे, व्यापारी महासंघांचे अध्यक्ष खानजी धल,भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष शैलेश सकपाळ, संतोष शिंदे, नितीन परब,तुषार मोरे,घोलप, श्रिकांत रेड्डी,महिला आघाडीच्या मंजू धल आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट