
बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात अंबरनाथ पोलिस करणार गुन्हा दाखल
- by Rameshwar Gawai
- Sep 02, 2020
- 665 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : बजाज फायनान्स कंपनीच्या विरोधात अंबरनाथ पोलिस प्रशासन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे, मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ चिखलोली,बारवी डॅम रोड शिवमंदिर तलावा परिसरात राहणारे श्री साम्राज्य साप्ताहिकाचे संपादक तसेच पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे यांनी त्यांच्या पत्निच्या नावे बजाज फायनान्स कंपनी मधुन कर्ज घेतले असताना कर्जाचा मासिक हप्ता भरणेसाठी विलंब झाला असता काही दिवसांपूर्वी बजाज फायनान्स कंपनीच्या गुंडानी श्री ठोंबरे यांना अपशब्द वापरुन शिविगाळ केली होती सदर प्रकरणी पत्रकार अरुण ठोंबरे यांनी आर बी आयला तक्रार केली असताना कंपनींने समझोता करून माफी मागितली आणि कर्जाबाबत सेटलमेंट करुन तीन टप्प्यात कर्ज फेडण्यासाठी मुदत दिली तरी सुध्दा दुसरीकडे बजाज फायनान्स कंपनीचे गुंड सातत्याने फोन करुन परिवारातील आया बहिणींची नावे घेऊन अगदी अश्लील भाषेत खालच्या पातळीवर जाऊन शिविगाळ करत आहेत. सध्या कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार माजला असुन ठाणे जिल्ह्यातील शहरांना देखील याचा फार मोठा आर्थिक फटका बसला असून पत्रकारांवर सुध्दा उपासमारीची वेळ आली आहे, पत्रकार हा आपल्या जिवाची बाजी लावून वृत्त संकलन करून शासनाचे धोरण आणि उपाययोजना, शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत असतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन नेहमीच सामाजिक जीवनात महत्त्वाच्या भूमिका बजावत असताना पत्रकारांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे असे असताना सध्य स्थितीत कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने फायनान्स कंपन्यांना कर्ज वसुली बाबत कडक निर्बंध घातले असताना देखील बजाज फायनान्स कंपनी शासनाचा आदेश धाब्यावर बसवून आपल्या गुंडा मार्फत घरातील मुली,बाळी,आई,बहीण यांच्या बाबत अतिशय घाणेरड्या शब्दांचा प्रयोग करून जबरदस्ती वसुली करत आहेत या बाबत गंभीर दखल घेत पत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे, ठाणे जिल्हा सरचिटणीस प्रदिप गोविंद रोकडे यांनी सादर बजाज फायनान्स कंपनी आणि त्यांच्या वसुली गुंडावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात निवेदन देवून केली असुन या बाबत कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन अंबरनाथ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय धुमाळ साहेब यांनी दिलेअसुन हा प्रश्न तमाम पत्रकारांच्या न्याय हक्काचा असल्याने या बाबत तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे पत्रकार सुरक्षा समितीचे ठाणे जिल्हा सरचिटणीस श्री प्रदिप गोविंद रोकडे यांनी सांगितले.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम