बारवी धरण क्षेत्र परिसरातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बदलापूर / प्रतिनिधी : बारवी धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे बारवी धरण ओव्हरफ्लो होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर बारवी धरण परिसरातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
      गेल्या दोन दिवसांपासून बारवी धरण परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बारवी धरणातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बारवी धरणात शुक्रवारी (ता.२८) दुपारी ३ वाजेपर्यंत  पाण्याची पातळी ७१.१५ मिटर इतकी  झाली आहे. त्यातच धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे.  धरणाच्या पाण्याची पातळी ७२.२० ते ७२.६० मीटर पातळीवर आल्यानंतर धरणाच्या स्वयंचलित गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरु होईल. या पार्श्वभूमीवर धरण क्षेत्रातील नदी काठावरील अस्नोली , रहाटोली, चोण, सांगावं, चांदप, कारंद, पिंपलोळी, चांदप पाडा आदी  ठिकाणच्या नागरिकांना एमआयडीसी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट