बदलापूरात भाजपाचे घंटानाद आंदोलन.

बदलापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील देवस्थाने, धार्मिक स्थळे नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी शनिवारी(ता. २९) बदलापूरात भाजपाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वा.बदलापूर पूर्वेकडील गांधी चौक तसेच विवेक आनंद सोसायटीतील गणेश मंदिरासमोर फिजिकल डिस्टनसिंग व इतर नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे बदलापूर शहराध्यक्ष संजय भोईर यांनी दिली.

संबंधित पोस्ट