अंबरनाथ येथील विवाहितेस सासरच्या मंडळींनी घराबाहेर हाकलले दारासमोरील पायऱ्यांवर उपाशी बसून काढले अकरा दिवस
- by Rameshwar Gawai
- Aug 28, 2020
- 584 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ मधील एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासरच्या मंडळींनी घराबाहेर हाकलून दिल्याने ही महिला गेल्या न्याय हक्कासाठी अकरा दिवसांपासून घराबाहेर इमारतीच्या पायऱ्यांवर उपाशी बसून दिवस काढत होती . अनेकदा विनवणी करून देखील तिला घरात घेतले नाही व उलट तिरस्कारपूर्ण वागणूक दिल्यानंतर अखेर तिने पती व सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार केली. यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
स्वरूपा (२९) या औरंगाबाद येथे राहणाऱ्या महिलेचा विवाह अंबरनाथ (पूर्व) येथील शिवगंगानगर परिसरात राहणाऱ्या विकास उमेश पवार याच्यासोबत १८ /११/२०१२ रोजी झाला होता . विकास हा मुंबई महानगरपालिकेत कामाला असून त्याच्या नावावर सदर फ्लॅट असल्याचे स्वरूपा व तिच्या आईवडीलांना सांगण्यात आले होते. दरम्यानच्या काळात स्वरूपाचा पती विकास पवार (३०), सासरे उमेश पवार (५७) नणंद उज्वला पवार , चुलत सासरे सुनील पवार व इतर सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला १६ ऑगस्ट २०२० घराबाहेर हाकलून दिले , त्यानंतर गेल्या अकरा दिवसांपासून स्वरूपा, पतीच्या फ्लॅट बाहेर पायऱ्यांवर बसून घरात घ्या म्हणून विनवण्या करीत होती , हा धक्कादायक प्रकार बघून इमारती मधील लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली , मात्र तरीदेखील पवार कुटुंबीयांनी त्याची पर्वा केली नाही ,यानंतर काही समाजसेवकांनी मध्यस्थी करून स्वरूपाची आई व नातेवाईकांना बोलावून घेतले .
अखेर काल या प्रकरणी स्वरूपाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिचा पती, सासरे, नणंद, चुलत सासरे व इतर सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मात्र अद्याप पर्यंत या निर्दयी सासर च्या मंडळीवर कोणती ही कारवाई केली नाही .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम