स्वच्छता अभियान २०२० मध्ये अंबरनाथ शहरा ने देशात १८ वा आणि राज्यात ३ रा क्रमांक पटकावला .
- by Rameshwar Gawai
- Aug 20, 2020
- 2067 views
अंबरनाथ (प्रतिनिधी) : अंबरनाथ स्वच्छता भारत अभियान २०२० अंतर्गत केंद्र सरकार तर्फे करण्यात आलेल्या पाहणी मध्ये अंबरनाथ शहराला देशातील ३८२ शहरामधून १८ वा तर राज्यातील ३३ शहरांमधून ३ क्रमांक मिळाला आहे,
अंबरनाथ शहरा तील तत्कालीन नगराध्यक्षा मनीषा वाळेकर,मुख्याधिकारी देविदास पवार यांचा कारकीर्दी मध्ये त्यांनी शहरात स्वच्छता अभियान नियमितपणे व अचूकपणे राबविले होते तर त्यानी योग्य ते मार्गदर्शन केल्यानेच हे पारितोषिक मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे,
दरम्यान स्वछता अभियान अंतर्गत ब्रँड एंबेसडर म्हणून नेमणूक केलेले सलील झवेरी आणि त्यांच्या पथकाने,शहरात स्वछता राखावी म्हणून केंद्र सरकार चे विशेष अधिकारी संकेत थोरात तसेच आरोग्य विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रभागामध्ये बैठका घेऊन नागरिका मध्ये स्वच्छते विषयी जनजागृती केली होती,
अंबरनाथ ला केंद्र सरकार कडून मिळालेल्या या बहुमाना चे मानकरी असलेल्या माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, व तत्कालीन मुख्याधिकारी देविदास पवार,सर्व माजी नगरसेवक सभापती,आरोग्य विभाग, सर्व अधिकारी,व कर्मचारी,ठेकेदार,शहरातील तमाम नागरिक व सामाजिक संस्था चे कौतुक अंबरनाथ नगरपालिकेचे प्रशासक व प्रांताधिकारी,जगतसिंग गिरासे आणि मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांनी केले असून त्याना शुभेच्छा दिल्या आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम