आदिवासींना आशा फाउंडेशनचा मदतीचा हात.

बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापूर जवळील ग्रामीण भागाला काही दिवसांपूर्वी वादळाचा तडाखा बसला होता. वादळामुळे अनेक आदिवासी कुटुंबांच्या घरांचे पत्रे उडाले होते. त्यामुळे भर पावसात पत्रे नसलेल्या घरात रहायचे कसे? असा प्रश्न या आदिवासी बांधवांसमोर उभा होता. याबाबत माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते  व आशा फाउंडेशनचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी भोज व तारवाडी येथील काही आदिवासींना घरासाठी पत्रे देऊन मदतीचा हात दिला. घरांचे पत्रे वादळात उडाल्याने या आदिवासी बांधवाना घरात राहणे शक्य नव्हते. त्यामुळे आपण यथाशक्ती पत्रे देऊन त्यांच्या अडचणीत खारीचा वाटा उचलल्याचे समीर देशमुख यांनी सांगितले. वादळाचा फटका बसलेल्या या आदिवासी बांधवांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी,अशी मागणीही त्यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट