
बदलापूरात ऑनलाईन गणेशोत्सव स्पर्धा
- by Rameshwar Gawai
- Aug 14, 2020
- 771 views
बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापुरात भाजपा प्रवक्ते व माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी ऑनलाइन गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ही स्पर्धा असून इच्छुक स्पर्धकांना व्हाट्सएपच्या माध्यमातून २१ ऑगस्ट पर्यंत नावे नोंदवावी लागणार आहेत. तसेच नाव नोंदणी झाल्यानंतर गणेशमूर्ती तसेच सजावटीचे फोटो व पत्ताही व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवावा लागणार आहे. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धेतील प्रत्येकी पाच विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कमेचे पारितोषिक व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव, मंडळाचा सामाजिक उपक्रम, मंडळांचे नाविन्यपूर्ण उपक्रम, कोरोना प्रतिबंधात्मक उपक्रम, तसेच आकर्षक सजावट या निकषांच्या आधारे विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. बदलापूरात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गणेश भक्तांनी व गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन राजेंद्र घोरपडे यांनी केले आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम