मागच्या वर्षी ४ ऑगस्टला ओव्हरफ्लो झालेलं बारवी धरण यंदा अवघं ४९ टक्केच भरलं.

ठाणे जिल्ह्याला यावर्षी पाणीटंचाईची बसणार झळ

बदलापूर / प्रतिनिधी : ठाणे जिल्ह्याला यंदा पाणीकपातीच्या झळा बसण्याची शक्यता आहे. कारण जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे  बारवी धरण यंदा अवघं ४९ टक्केच भरलं आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा भाईंदर,कल्याण डोंबिवली,उल्हासनगर या मोठ्या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि एमआयडीसी, स्टेम या प्राधिकारणांना बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी, म्हणजे ४ ऑगस्ट २०१९ रोजी  हेच बारवी धरण ओव्हरफ्लो झाले  होते . मात्र यंदा जून आणि जुलै महिन्यात पावसाने  दडी मारली असून ऑगस्ट महिना आला तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे पाऊस पडला नाही म्हणुन  धरणही  भरलं नाही, तर आगामी काळात संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे . अजुन पावसाला दोन महिने शिल्लक आहेत या कालावधीत धरण क्षेत्रात  समाधान कारक पाऊस पडला तर  धरण भरन्याची शक्यता आहे .

संबंधित पोस्ट