बदलापुरात मनसेने केली वीज बिलांची होळी.

बदलापूर (प्रतिनिधी) : महावितरणकडून बदलापूरातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले देण्यात आल्याच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज बिलांची होळी करून वाढीव वीज बिले रद्द करण्याची मागणी केली.
    
मनसेच्या बदलापूर शहर मध्यवर्ती कार्यालयासमोर शहराध्यक्ष जयेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मनसेचे उपशहराध्यक्ष सुजित कराळे, महिला शहर संघटक नंदा पांढरे  पंकज कोंडे, संदेश मेढे, सुरेश शिंदे, रवि कोळी, प्रशांत अडसूळ, प्रवीण शेलार, किरण वाघ, सुदीप फणसे, सुशांत करगुटकर अनिकेत जाधव, नीला भाकवे मधुरा आंबेकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मनसेच्या वतीने हे पहिल्या टप्प्यातील आंदोलन असून वाढीव बिले रद्द होईपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जयेश कदम यांनी सांगितले.


संबंधित पोस्ट