आता प्रभागावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर.

बदलापूर (प्रतिनिधी) : बदलापुरातील कात्रप भागात असलेल्या प्रभाग क्रमांक ३० भोवती सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले गेले आहे. त्यामुळे या प्रभागातील प्रत्येक हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपल्या जात असल्याने हा प्रभाग सुरक्षित प्रभाग झाला असल्याची माहिती या प्रभागाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी दिली आहे.

बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागात असलेल्या या प्रभागात ठिकठिकाणी १६ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागातील सर्व अंतर्गत व बाह्य रस्ते, उद्याने आदींचा समावेश आहे. या प्रभागातल्या प्रत्येक भागावर, रस्त्यावर, उद्यानांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर आहे. प्रभागाच्या हद्दीतील एकही रस्ता यातून सुटलेला नाही. त्यामुळे या प्रभागात चोऱ्या वा इतर कोणतेही गैरप्रकारांना आळा घालणे शक्य होणार  असल्याने नागरिकांसाठी हा प्रभाग आता सुरक्षित प्रभाग ठरणार असल्याचा दावा माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे. संभाजी शिंदे यांच्या प्रयत्नातून नगर परिषदेच्या माध्यमातून ५ लाख रुपये खर्च करून या प्रभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लवकरच १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहितीही संभाजी शिंदे यांनी दिली.

संबंधित पोस्ट