कोरोना योद्ध्यांना राखी बांधून रक्षाबंधन' बदलापूरातील महिला कार्यकर्त्यांचा स्तुत्य उपक्रम .
- by Rameshwar Gawai
- Aug 02, 2020
- 991 views
बदलापूर / प्रतिनिधी : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या डॉक्टर, परिचारिका व रुग्णालय कर्मचाऱ्यांना व पालिका अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना राखी बांधून बदलापूरातील महिला कार्यकर्त्यांनी रक्षा बंधनाचा सण साजरा केला.
बदलापूर शहरातील विविध राजकीय पक्ष-संघटनांच्या महिला कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी तसेच इतर सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचारी आणि बदलापूर, सोनिवली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी, महिला कर्मचारी आदींना राखी बांधण्यात आली. मनीषा आंबेकर, संगीता चेंदवणकर, संपदा लोखंडे, नीरजा आंबेरकर, मीना साळवी, माधुरी सकटे, मंगल डोळस ,गीता गडकर आणि केतकी सोनवणे
आदी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळी या सर्वांनी दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम